Marathi Melava : मराठी मेळाव्याआधी राजकारण तापलं, उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र, दादरमध्ये झळकले निनावी बॅनर

Last Updated:

Marathi Melava Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू जवळपास 19 वर्षाच्या कालावधीनंतर राजकीय मंचावर एकत्र दिसणार आहेत. या मेळाव्याआधीच राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या लक्ष्य करणारे बॅनर झळकले आहेत.

'मुंबई मा जलेबी...', मराठी मेळाव्याआधी राजकारण तापलं, ठाकरेंविरोधात दादरमध्ये बॅनरबाजी
'मुंबई मा जलेबी...', मराठी मेळाव्याआधी राजकारण तापलं, ठाकरेंविरोधात दादरमध्ये बॅनरबाजी
उदय जाधव, प्रतिनिधी, मुंबई : त्रिभाषा सक्तीचा आदेश राज्य सरकारने रद्द झाल्यानंतर आज ठाकरे बंधूच्या पुढाकारातून विजयी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या निमित्ताने उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू जवळपास 19 वर्षाच्या कालावधीनंतर राजकीय मंचावर एकत्र दिसणार आहेत. या मेळाव्याआधीच राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या लक्ष्य करणारे बॅनर झळकले आहेत.
आज वरळीत होणाऱ्या मेळाव्यासाठी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मुंबईतील या मेळाव्यासाठी उपस्थित राहण्यासाठी पुणे, नाशिकसह इतर भागातूनही कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले आहेत. आज सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास या मेळाव्याची सुरुवात होणार आहे. मात्र, त्याआधीच उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडणारे बॅनर झळकले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचा आण मनसेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या दादरमध्ये हे बॅनर झळकले आहेत. विशेष म्हणजे हे सगळे बॅनर निनावी आहेत.
advertisement

बॅनरवर मजकूर काय?

दादर परिसरात पुन्हा एकदा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करणारे बॅनर झळकले असून, राजकीय वर्तुळात त्यावरून चांगलीच खळबळ माजली आहे. "जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा" असा मजकूर असलेल्या या बॅनरची जोरदार चर्चा सुरू आहे. या बॅनर्सवर कुणाचेही नाव नसल्याने ते कोणाच्या आदेशावर लागले, याबाबत संभ्रम आहे.
advertisement
या बॅनरवर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. त्याशिवाय 'मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा' असा ठळक मजकूर आहे. त्याशिवाय, विविध वृत्तपत्रे आणि वृत्तसंकेतस्थळावरील मजूकर, मथळे आहेत. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने याआधीच्या काही निवडणुकीत कशाप्रकारे गुजराती मतांसाठी भेटीगाठी, विशेष मोहीम राबवली होती, याचे वृत्तांकन आहे.
दादरमध्ये झळकलेल्या या बॅनरमुळे राजकारण आणखीच तापण्याची शक्यता आहे. मध्यरात्रीच्या सुमारास हे बॅनर लागले असल्याची माहिती आहे.
advertisement

एकनाथ शिंदेंचे 'जय गुजरात'...

शुक्रवारी, पुण्यातील एका कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी 'जय गुजरात' असे म्हटल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली.  या कार्यक्रमात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील होते. या वक्तव्यानंतर ठाकरे गटाने शिंदे यांना लक्ष्य केले होते.  त्यातच आता  उद्धव ठाकरेंवर गुजरातीच्या मुद्यावर टीका करणारे बॅनर झळकल्याने याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
advertisement

इतर महत्त्वाची बातमी:

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Marathi Melava : मराठी मेळाव्याआधी राजकारण तापलं, उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र, दादरमध्ये झळकले निनावी बॅनर
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement