Uddhav Thackeray : संजय राऊत, शरद कोळी,किरण माने...ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, कोण आहे 40 शिलेदार

Last Updated:

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 40 प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

shiv sena ubt star campaigners list
shiv sena ubt star campaigners list
Uddhav Thackeray Star Campaigners : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून 40 प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत शिवसेनेचे खासदार संजय राऊत, प्रियांका चतुर्वेदी, ओमराजे निंबाळकर,भास्कर जाधव या सारख्या नेत्यांना या यादीत स्थान देण्यात आले आहे. त्याचसोबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे स्टार प्रचारक असणार आहे. दरम्यान ठाकरे गटाच्या स्टार प्रचारक यादीतील 40 शिलेदार कोण आहेत? हे जाणून घेऊयात.
ठाकरे गटाचे स्टार प्रचारक
1) उद्धव बाळासाहेब ठाकरे
2) आदित्य ठाकरे
3) सुभाष देसाई
4) संजय राऊत
5) अनंत गीत
6) चंद्रकांत खैरे
7) अरविंद सावंत
8) भास्कर जाधव
9) अनिल देसाई
10) विनायक राऊत
11) अनिल परब
12) राजन विचारे
13) सुनील प्रभू
14) आंदेश बांदेकर
15) वरूण सरदेसाई
16) अंबादास दानवे
advertisement
17) रवींद्र मिर्लेकर
18) विशाखा राऊत
19) नितीन बानगुडे पाटील
20) राजकुमार बाफना
21) प्रियांका चतुर्वेदी
22) सचिन अहिर
23) मनोज जामसुतकर
24) सुषमा अंधारे
25) संजय (बंडू) जाधव
26) किशोरी पेडणेकर
27) ज्योती ठाकरे
28) शीतल शेठ देवरूखकर
29) जान्हवी सावंत
30) शरद कोळी
31) ओमराजे निंबाळकर
32) सुनील शिंदे
advertisement
33) वैभव नाईक
34) नितीन देशमुख
35) आनंद दुबे
36) किरण माने
37) अशोक तिवारी
38) प्रियांका जोशी
39) सचिन साठे
40) लक्ष्मण वाडले
जालन्यातून ठाकरे काय म्हणाले? 
शिवसेना ठाकरे गटाने 40 प्रचारकांच्या नावांची यादी राज्य निवडणूक आयोगाला सादर केली आहे.हे 40 प्रचारक आता राज्य पिंजून काढत शिवसेनेच्या जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रयत्नशील असतील.
advertisement
राजकारण म्हटलं की पदाधिकाऱ्यांचं येणं जाणं असतं.जिंकण्यासाठी काही वेळेला ते करावं लागतं.पण आता आयातीवर लक्ष देऊ ना आणि निर्यात होऊ देऊ नका. आपल्या निष्ठावंतांना लढू द्या, नवी पालवी फुटूद्या,आपली मुळं मजबूत हौदयात, असा सल्ला उद्धव ठाकरे यांनी नेते कार्यकर्त्यांना दिला आहे.
मांडणी करा, बूथ प्रमुख नेमा, मग एक मोठा मेळावा घ्या, मी त्यासाठी येईन.प्रत्येकाने आपल्याला विभागातली मतदार यादी मागवून घ्या. घरोघरी जाऊन मतदार खरंच तिथे राहतो का ते पहा, अशा सुचनाही उद्धव ठाकरे यांनी केल्या.
advertisement
आम्हाला हिंदुत्व शिकवत असतील तर झेंड्यावर असलेला हिरवा रंग भाजपने काढून दाखवावा. आपली निशाणी कधी झेंड्यावर नव्हती लावली.कारण भगवा फक्त आपला आहे. हिवदुत्वाबद्दल भ्रम तयार केलय. त्याचं हिंदुत्व बेगडी आहे,आपलं हिंदुत्व देश प्रेमी आहे. आपली जबाबदारी पुढची पिढी भगवा पुढे कसं नेईल ही आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Uddhav Thackeray : संजय राऊत, शरद कोळी,किरण माने...ठाकरे गटाच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर, कोण आहे 40 शिलेदार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement