वंचितला 2 आणि काँग्रेसला 1 जागा तरी उल्हासनगरमध्ये किंगमेकर, डाव कसा उलटला?

Last Updated:

उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने महापालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे

News18
News18
ठाणे : उल्हासनगर पालिकेच्या निवडणुकीत महायुती फिस्कटल्याने शिवसेना, टीम ओमी कलानी व साई पक्षाची आघाडी आणि भाजपमध्ये थेट लढत झाली. त्यामुळे दोन्ही पक्षांना प्रत्येकी 37 जागा मिळाल्या. वंचितला दोन आणि काँग्रेसने केवळ एका जागेवर विजय मिळविला आहे. ठाकरे बंधूंना खातेही उघडता आले नाही; मात्र तरीही सत्तेचे गणित जुळवण्यासाठी काँग्रेस, वंचित आणि इतरांची भूमिका निर्णायक असणार आहे. कारण सत्तेच्या जवळ जाण्यासाठी जादूई आकडा गाठण्यासाठी त्यांना इतर पक्षाची मदत घ्यावी लागणार आहे.  उल्हासनगर महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने महापालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाली आहे. एकूण 78 जागांच्या महापालिकेत बहुमतासाठी 40 जागांचा आकडा आवश्यक असताना प्रमुख पक्ष या आकड्यापासून थोडेसे दूर राहिले आहेत.
निवडणूक निकालानुसार शिवसेनेच्या दोस्तीच्या गटबंधनाने सर्वाधिक 37 जागांवर विजय मिळवला आहे. त्यांच्यानंतर भारतीय जनता पक्षाने 37 जागांवर यश संपादन केले आहे. वंचित विकास आघाडीला दोन जागांवर विजय मिळाला असून काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे. या निकालामुळे महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी दोन्ही प्रमुख गटांना इतर पक्षांच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. शिवसेनेच्या दोस्तीच्या गटबंधनाला किमान दोन अतिरिक्त जागांचा पाठिंबा हवा . बहुमताचा आकडा गाठण्यासाठी आहे, तर भाजपला सत्तेसाठी 3 जागांची गरज भासणार आहे.
advertisement

छोट्या पक्षांची भूमिका आता निर्णायक ठरणार

वंचित विकास आघाडी आणि काँग्रेस या छोट्या पक्षांची भूमिका आता निर्णायक ठरणार आहे. शिवसेना- भाजपा या दोन्ही पक्षांकडे संख्याबळ आहे. त्यामुळे निवडून आलेले वंचित बहुजन आघाडीचे 2 नगरसेवक, काँगेसचा 1 आणि अपक्ष 1 अशा नगरसेवकांचा भाव चांगलाच वधारला आहे. कोणत्या गटाला पाठिंबा द्यायचा, याबाबत त्यांच्या निर्णयाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
advertisement

राजकीय हालचालींना वेग

निकालानंतर लगेचच राजकीय हालचालींना वेग आला असून विविध पक्षांमध्ये चर्चा, बैठका आणि संपर्क सुरू झाले आहेत. उल्हासनगर महापालिकेत कोण सत्ता स्थापन करणार, याचा निर्णय येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार असून शहराच्या राजकारणात मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
वंचितला 2 आणि काँग्रेसला 1 जागा तरी उल्हासनगरमध्ये किंगमेकर, डाव कसा उलटला?
Next Article
advertisement
Santosh Dhuri On MNS : महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसेला..."
महापालिका निवडणुकीत मनसेची धूळदाण, संतोष धुरींचा पहिला वार; "उद्धव ठाकरेंनी मनसे
  • महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

  • भाजपमध्ये प्रवेश केलेले नेते संतोष धुरी यांनी मनसेच्या कामगिरीवर आणि रणनीतीवर पह

  • संतोष धुरी यांचा उद्धव ठाकरेंवर खळबळजनक आरोप...

View All
advertisement