Ganesh Chaturthi 2025: कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना? बाप्पा भक्तांसाठी रेल्वेची विशेष सेवा, पाहा वेळापत्रक

Last Updated:

Ganesh Chaturthi 2025: गणेशोत्सवात मुंबई, ठाणे आणि इतर उपनगरांमधून लाखो चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात. त्यामुळे रेल्वे आणि एसटी बसला प्रचंड गर्दी असते.

Ganesh Chaturthi 2025: कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना? बाप्पा भक्तांसाठी रेल्वेची विशेष सेवा, पाहा वेळापत्रक
Ganesh Chaturthi 2025: कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना? बाप्पा भक्तांसाठी रेल्वेची विशेष सेवा, पाहा वेळापत्रक
मुंबई: सर्वांचा लाडका गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गणेशोत्सवासाठी मुंबईसह उपनगरांतून लाखो चाकरमानी कोकणात जातात. त्यासाठी दरवर्षी रेल्वेकडून विशेष तयारी केली जाते. यंदा मध्य रेल्वेने 250 गणपती स्पेशल ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, या गाड्यांचं आरक्षण फुल्ल झाल्यामुळे अनेक गणेशभक्तांची पंचाईत झाली आहे. ज्यांना नियमित गाड्यांमध्ये आरक्षण मिळालं नाही, अशांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वेने यंदा गणेशोत्सवानिमित्त अनारक्षित गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
गणेशोत्सव हा कोकणातील सर्वात मोठा सण मानला जातो. या काळात मुंबई, ठाणे आणि इतर उपनगरांमधून लाखो चाकरमानी कोकणात आपल्या गावी जातात. गणेशोत्सवाच्या काळात रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी होत असल्याने प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. अशा परिस्थितीत रेल्वे प्रशासनाने केलेली ही व्यवस्था मोठा दिलासा मानला जात आहे.
advertisement
समोर आलेल्या माहितीनुसार, 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत प्रवाशांच्या सोयीसाठी या अनारक्षित गाड्या धावतील. कोकण रेल्वेमार्गावरील या गाड्यांना कोलाड, मानगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी रोड, मडगाव जंक्शन, कारवार आणि उडुपी अशा स्थानकांवर थांबे दिले जाणार आहेत. आयआरसीटीसीची वेबसाईट, रेल वन अ‍ॅपवर तसेच रेल्वेच्या तिकीट खिडक्यांवर याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध असेल.
advertisement
कोकणातील प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पनवेल आणि चिपळूण दरम्यान 6 अनारक्षित गणेशोत्सव विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे.
पनवेल-चिपळूण दरम्यान 6 अनारक्षित गाड्यांचं वेळापत्रक
गाडी क्रमांक 01159 पनवेल ते चिपळूण: ही गाडी 5, 6 आणि 7 सप्टेंबर 2025 रोजी संध्याकाळी 4 वाजून 40 मिनिटांनी पनवेलहून निघेल आणि रात्री 9 वाजून 55 मिनिटांनी चिपळूणला पोहोचेल.
advertisement
गाडी क्रमांक 01160 चिपळूण ते पनवेल: ही गाडी 5, 6 आणि 7 सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजून 5 मिनिटांनी चिपळूणहून निघेल आणि दुपारी 4 वाजून 10 मिनिटांनी पनवेलला पोहोचेल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Ganesh Chaturthi 2025: कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना? बाप्पा भक्तांसाठी रेल्वेची विशेष सेवा, पाहा वेळापत्रक
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement