Vaibhav Khedekar : 'BJP च्या लोकांना भेटलो,पण पक्षप्रवेश...', मनसेतून हकालपट्टीनंतर वैभव खेडेकर स्पष्टच बोलले
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
वैभव खेडेकर यांच्यासह तिघांची महाराष्ट्र नवनिर्माण पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.या हकालपट्टीनंतर आता वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजून मांडली आहे.
Vaibhav Khedekar on MNS Expell letter : खेड, रत्नागिरी : कोकणातील मनसेचा धडाडीचा चेहरा असलेल्या वैभव खेडेकर यांच्यासह तिघांची महाराष्ट्र नवनिर्माण पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.या हकालपट्टीनंतर आता वैभव खेडेकर यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजून मांडली आहे.त्यामुळे या पक्षाच्या कारवाईवर ते नेमकं काय म्हणाले आहेत?
माझ्यासह जिल्हाध्यक्ष यांचसोबत इतर दोघांना बडतर्फ केल्याचे पत्र वाचून अतिशय दुःख झालं आहे. हे पत्र म्हणजे माझ्या निष्ठेचे सर्टिफिकेट असल्याचे वैभव खेडेकर म्हणाले आहेत. मी अनेक आंदोलने केली, जेलची हवा खाल्ली, प्रत्येक कार्यक्रमात माझा सहभाग राहिला.
कोकणात पक्षाची बीजे मी रुजवली. खेड नगर परिषद माझ्या नेतृत्वात पंधरा वर्षे मनसेकडे राहिलं. मी पहिल्यांदा थेट नगराध्यक्ष झालो. तसेच पक्ष म्हणून कोकणात आघात झाले तेव्हा मी लोकांसोबत राहिलो. कोविड मध्येही देखील मी लोकांच्या सोबत होतो.त्यामुळे पक्ष रुजावा ही माझी भूमिका होती असे वैभव खेडेकर यांनी सांगितले.
advertisement
भाजपच्या काही लोकांना भेटलो म्हणून मी पक्षांतर करत असल्याच्या संशयावरून माझ्यावर ही कारवाई झाल्याचे वैभव खेडेकर यांनी सांगितले. तसेच मी पक्षप्रवेश करणार नव्हतो. कार्यकर्त्यावर तडीपारीची होणारी कारवाई थांबावी म्हणून मी नितेश राणे यांना भेटलो होतो, असे स्पष्टीकरण खेडेकर यांनी यावेळी दिले.तसेच विकास होणे महत्वाचे असल्याने सत्ताधाऱ्यांना भेटायचो. आणि त्यामुळेच माझ्यावर कारवाई झाल्याचेही खेडेकर सांगतात.
advertisement
खेडेकर पुढे म्हणाले, माझ्याबद्दल संशय निर्माण केला गेला. याबद्दल मी राज ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला,पण मला अद्याप भेट घेता आली नाही आहे. पण संदीप देशपांडे आणि अविनाश जाधव यांच्या माध्यमातून मी भेटीचे अनेक प्रयत्न केले.पण त्याला यश आले नाही. हे माझं दुर्दैव.
हे पत्र स्वतः साहेबांनी काढलं असत तर तो त्यांचा आदेश आल्याचा आनंद बाळगला असता. पण पक्षाची शिस्त बिघडेल असे मी कधीच काम केले नाही. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत होतो म्हणून माझ्यावर अनेक कारवाया झाल्या. पक्षासाठी केलेली माझी धडपड आज तोकडी पडली, असे म्हणताना वैभव खेडेकर भावूक झाले. आणि राज साहेब तुम्ही कालही मनात होता आजही आहात आणि उद्याही राहाल असे म्हणताना वैभव खेडकर भावूक झाले.
advertisement
तीस वर्षे पक्ष म्हणून कुटुंबाशी जोडलो गेलो होतो.आजच्या पत्रामुळे कौटुंबिक संबंधाला ब्रेक मिळाला.आजच पत्र पाहून धक्का बसला.असं पत्र मला कधीही अपेक्षित नव्हतं. हातात घेतलेलं शिवधनुष्य अर्धवट ठेवणार नाही.पुढील निर्णय घ्यावा लागेल.अजून निर्णय घेतलेला नाही, असे देखील वैभव खेडेकर यांनी सांगितले.
advertisement
फिनिक्स पक्षाप्रमाणे मी पुन्हा उभारी घेईन.माझ्यावर अशा पद्धतीची वेळ येणार असेल तर बाकीच्या पदाधिकाऱ्यांनी विचार करण्याचीही वेळ आहे.झालेली घटना नाकारता येत नाही.हे स्वीकारून मी पुढे जाईल.मला अजिबात घाई नाही.मी योग्य वेळेची वाट पाहून निर्णय घेईन, असे वैभव खेडेकर म्हणाले आहेत. तसेच लवकरच मेळावा घेणार, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले.
चर्चा आणि संवाद झाले तर असे निर्णय घेण्याची वेळ येत नाही, अशा शब्दात त्यांनी पक्षाच्या धोरणावरही टीका केली. तसेच राज ठाकरेंचा आमच्याकडे फोन नंबर नाही.केवळ मेसेज करू शकतो असा नंबर आमच्याकडे आहे, असे देखील वैभव खेडेकर यांनी सांगितले.
view commentsLocation :
Ratnagiri,Maharashtra
First Published :
August 25, 2025 6:01 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Vaibhav Khedekar : 'BJP च्या लोकांना भेटलो,पण पक्षप्रवेश...', मनसेतून हकालपट्टीनंतर वैभव खेडेकर स्पष्टच बोलले


