Virar News : विरार इमारत दुर्घटनेनंतर नालासोपाऱ्यात मोठी घटना,नागरीक जीव मुठीत धरून धावले, नेमकं काय घडलं?

Last Updated:

नालासोपारामध्ये मोठी घटना घडली आहे. नालासोपारामध्ये इमारत कलंडल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे नागरीकांनी जीव मुठीत घेऊन धाव घेतला आहे. सध्या संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण आहे.

vasai virar news
vasai virar news
Vasai Virar News : विजय देसाई,नालासोपारा : गेल्याच आठवड्यात विरारमध्ये एक चार मजली इमारत कोसळून 17 जणांचा मृत्यू झाला होता, तर 9 जण गंभीररित्या जखमी झाले आहेत. या घटनेच्या जखमा ताज्या असताना आता नालासोपारामध्ये मोठी घटना घडली आहे. नालासोपारामध्ये इमारत कलंडल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे नागरीकांनी जीव मुठीत घेऊन धाव घेतला आहे. सध्या संपूर्ण परिसरात गोंधळाचे वातावरण आहे.
नालासोपारा पुर्वेच्या प्रगती नगर परिसरात पतिसार येथील सितारा बेकरीजवळील सबा अपार्टमेंटचा एक भाग अचानक कलंडल्याची घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास घडली. या घटनेची माहिती मिळताच नागरीकांनी जीव मुठीत धरून धाव घेतला आहे. त्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे.
खरं तर सुमारे 20 वर्षे जुनी ही इमारत होती. इमारतीचा भाग कलंडल्याने परिसरात नागरीकांची मोठी धावपळ झाली होती.या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ कारवाई करून संपूर्ण इमारत रिकामी केली. नागरिकांनी घाईघाईने आपले घरगुती सामान बाहेर काढण्यास सुरुवात केली. त्यामुळे संपूर्ण परिसरात एकच गोंधळाचे वातावरण होते.
advertisement
दरम्यान, वसई-विरार महानगरपालिका, पोलिस, तसेच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून पुढील परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, जुन्या आणि धोकादायक इमारतींबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.ही घटना थोडक्यात टळली आहे. त्यामुळे विरारची पुनरावृत्ती होण्यापासून थोडक्यात नागरिक बचावले आहेत.
advertisement

विरार इमारत दुर्घटनेप्रकरणी चौघांवर कारवाई

विरार पूर्वे कडील विजय नगर येथील रमाबाई अपार्टमेंट इमारत दुर्घटने प्रकरणी तपास आता गुन्हे शाखा युनिट 3 कडे सोपवण्यात आला आहे. यापूर्वी बांधकाम व्यावसायिक नित्तल साने (वय 48) यांना या प्रकरणात अटक करण्यात आली होती. त्यानंतर, तपास गुन्हे शाखा युनिट 3 कडे वर्ग करण्यात आला.
advertisement
पोलिसांनी आता मूळ भूखंड मालक, आणि मेंटेनन्स वसूल करणारे परशुराम दळवी यांच्या दोन मुली - शुभांगी भोईर (वय 38) आणि संध्या पाटील (35 वय) तसेच सुरेंद्र भोईर (46 वय) आणि मंगेश पाटील (35 वय) यांना अटक केली आहे. या सर्वांना वसई सत्र न्यायालयात हजर केले असता 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Virar News : विरार इमारत दुर्घटनेनंतर नालासोपाऱ्यात मोठी घटना,नागरीक जीव मुठीत धरून धावले, नेमकं काय घडलं?
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement