Walmik Karad : वाल्मिक कराडच्या नावे परदेशातही संपत्ती? सरकारी वकिलांच्या दाव्यावर भुवया उंचावल्या
- Published by:Prashant Gomane
 
Last Updated:
वाल्मिक कराडच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज केज सत्र न्यायायलयात हजर करण्यात आले होते. देशमुख यांचे सरकारी वकील यांनी सुनावणीच्या सुरूवातीलाच वाल्मीक कराड यांनी खंडणीची मागणी करत हातपाय तोडण्याची भाषा बोलली होती, असे कोर्टाला सांगितले.
Walmik Karad Custody : बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणात संशयित असलेले आणि खंडणीच्या गु्न्ह्यात अटकेत असलेल्या वाल्मिक कराड यांना आज मंगळवारी केज सत्र न्यायायलयात हजर करण्यात आले होते. यावेळी वाल्मिक कराडने देशाबाहेरील संपत्ती जमवल्याचा संशय करत वाल्मिक कराडला 10 दिवसांची सीआयडी चौकशी द्यावी, अशी मागणी देशमुखांचे सरकारी वकील यांनी कोर्टात केली आहे. तर त्या या कोठडीला कराडच्या वकिलांनी विरोध केला आहे. दरम्यान सरकारी वकील आणि आरोपी वकील यांच्यात तब्बल 35 मिनिटं युक्तिवाद पार पडला. यावेळी कोर्टात काय काय घडलं? हे जाणून घेऊयात.
वाल्मिक कराडच्या 14 दिवसांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला आज केज सत्र न्यायायलयात हजर करण्यात आले होते. देशमुख यांचे सरकारी वकील यांनी सुनावणीच्या सुरूवातीलाच वाल्मीक कराड यांनी खंडणीची मागणी करत हातपाय तोडण्याची भाषा बोलली होती, असे कोर्टाला सांगितले होते.यावर कराडचे वकील अॅड.सिद्धेश्वर ठोंबरे यांनी 29 नोव्हेंबरला धमकी दिली तर त्या दिवशी गुन्हा का दाखल केला नाही? असा सवाल केला होता.
advertisement
कराडचे वकील ठोंबरे कोर्टासमोर म्हणाले की, पंधरा दिवस कोठडीत असताना यांनी काय तपासले? सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराड दोन्ही कोठडीत असताना समोरासमोर चौकशी का केली नाही?तसेच कराड तपासाला सहकार्य करत आहेत मग आणखी पोलीस कोठडी कशासाठी? आता आणखी कोणता तपास करायचा राहिला आहे? अशा प्रश्नांची सरबत्ती वकील ठोंबरेंनी यावेळी केली.
advertisement
तसेच जर तुम्हाला बँक खात्याची चौकशी करायची आहे, तर त्यासाठी तंत्रज्ञान आहे.त्यामुळे आरोपीच्या चौकशीची गरज नाही. याआधी वाल्मिक कराड यांची 14 गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता झाली आहे. त्यामुळे आता आरोपीला पोलीस कोठडीची गरज नाही, असा युक्तीवाद आरोपीचे वकिल ठोंबरे यांनी केला.
तसेच जर 29 नोव्हेंबरला धमकी दिली तर त्या दिवशी गुन्हा का दाखल केला नाही? खंडणी मागितली मग पैसे दिल्याचे पुरावे सरकारी वकिलाकडे नाहीत, असे मुद्दे मांडत आरोपीचे वकील ठोंबरे यांनी कोठडीची मागणी फेटाळली.
advertisement
दरम्यान वाल्मीक कराडने याने देशातील आणि देशाबाहेर संपत्ती जमवली आहे का? इतर कोणाच्या नावावर संपत्ती खरेदी केली आहे का? याची देखील तपासी करायची आहे? या गोष्टी तपासायच्या आहेत. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि मालमत्तेच्या तपासणीसाठी वाल्मिक कराडाल 10 दिवसांची कोठडी द्या, अशी मागणी सरकारी वकिलांनी कोर्टाकडे केली. दरम्यान कोर्टाने निकाल राखून ठेवला आहे. काहीच वेळात आता याबाबत निर्णय येण्याची शक्यता आहे.
view commentsLocation :
Bid Rural,Bid,Maharashtra
First Published :
January 14, 2025 2:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Walmik Karad : वाल्मिक कराडच्या नावे परदेशातही संपत्ती? सरकारी वकिलांच्या दाव्यावर भुवया उंचावल्या


