Walmik Karad : 'कराडच्या पाठीराख्या मंत्र्याला आत टाका, एक जरी आरोपी सुटला तर...', जरांगेंचा सरकारला इशारा
- Published by:Prashant Gomane
 
Last Updated:
वाल्मिक कराडच्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीवर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, त्याने खूप पाप केले आहेत, आता त्याला फेडावं लागणार आहे, तो आता सुटणार नाही. आता वाल्मिक कराडच्या पाठीराख्या मंत्र्याला देखील आत (तुरूंगात टाकलं) यायला पाहिजे अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.
Manoj jarange On Walmik Karad Custody : आवादा कंपनीतील खंडणी आणि देशमुख खून प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याचा प्राथमिक तपास पूर्ण झाल्याचे गुन्हे अन्वेषण विभागाने सांगितल्याने बीड मकोका विशेष न्यायालयाने त्याला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. या न्यायालयीन कोठडीवर आता मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाल्मिक कराडचा पाठीराखा मंत्री आहे, तो सुद्धा आता यात यायला पाहिजे अशी मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. तसेच एक जरी आरोपी सुटला तर राज्य बंद पडू असा इशारा त्यांनी सरकारला दिला आहे.
वाल्मिक कराडच्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीवर बोलताना मनोज जरांगे म्हणाले की, त्याने खूप पाप केले आहेत, आता त्याला फेडावं लागणार आहे, तो आता सुटणार नाही. आता वाल्मिक कराडच्या पाठीराख्या मंत्र्याला देखील आत (तुरूंगात टाकलं) यायला पाहिजे अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.
देशमुख कुटुंब तुमच्या घरी आलं आहे, त्या कुटुंबाचा अपमान होईल अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेऊ नये असं जरांगे यांनी म्हटले आहे. बीड प्रकरणातील आरोपी सुटला तर देशमुख कुटुंबाच्या जीवाला धोका असून आरोपी देशमुख कुटुंब मारून टाकू शकतात अशी भीती देखील जरांगे यांनी व्यक्त केली आहे. न्याय देवता न्याय करेल, आरोपींना फासावर लटकवेल असा विश्वास जरांगे यांनी व्यक्त केलाय.
advertisement
तसेच धनंजय मुंडे टोळ्या उठवून मला जातीयवादी म्हणतोय असा अशी टीका जरांगे यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बीड प्रकरणावरून केलीय. बीड प्रकरणातील एक जरी आरोपी सुटला तर राज्य बंद पडू असं म्हणत तुम्ही जर एखाद्या आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर महाराष्ट्राची जनता शांत बसणार नाही असा इशारा मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिलाय.
advertisement
कराडच्या सीसीटीव्हीवर जरांगे काय बोलले?
मनोज जरांगे पाटील सीसीटीव्हीवर बोलताना म्हणाले की, या मधल्या एकाही आरोपीला सोडू नका. खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटला तर देशमुख कुटुंबियांवर संकट येऊ शकत. ते दहशत सु्द्धा पसरवून शकतात. देशमुख कुटुंबियांचा सुद्धा मर्डर करतील, अशी भीती त्यांनी यावेळी व्यक्त केली. तसेच आताच तर सिद्धच झालं आहे या सीसीटीव्हीमुळे त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी विशेष लक्ष देऊन या लोकाना सुटूच दिलं नाही पाहिजे, अशी मागणी जरांगे यांनी केली.
view commentsLocation :
Bid,Maharashtra
First Published :
January 22, 2025 2:11 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Walmik Karad : 'कराडच्या पाठीराख्या मंत्र्याला आत टाका, एक जरी आरोपी सुटला तर...', जरांगेंचा सरकारला इशारा


