Walmik Karad : शरण येताच वाल्मिक कराडने हात जोडले, CID कार्यालयात काय घडलं? पाहा VIDEO
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात चर्चेत असलेली आरोपी वाल्मिक कराड आज पुण्यात शरण आले आहेत. पुण्याच्या सीआयडी कार्यालयात येऊन त्यांनी स्वत: सरेंडर केलं. विशेष या घटनेच्या काही तासांपुर्वी त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला होता.
Walmik karad surrender : बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात चर्चेत असलेली आरोपी वाल्मिक कराड आज पुण्यात शरण आले आहेत. पुण्याच्या सीआयडी कार्यालयात येऊन त्यांनी स्वत: सरेंडर केलं. विशेष या घटनेच्या काही तासांपुर्वी त्यांनी एक व्हिडिओ संदेश जारी केला होता. या व्हिडिओत त्यांनी पुण्याच्या सीआयडी कार्यालयात आत्मसमर्पण केलं.त्यानंतर ते सीआयडी कार्यालयात दाखल झाले होते.या संबंधित आत्मसमर्पणाचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.
व्हिडिओत नेमकं वाल्मिक कराड काय म्हणाले होते?
सीआयडीला शरण जाण्यापुर्वी वाल्मिक कराडने एक व्हिडिओ जारी केला होता. या व्हिडिओत वाल्मिक कराड केज पोलिस स्टेशनला खोटी खंडणीची फिर्याद दाखल झाल्यामुळे मला अटकपुर्वचा अधिकार असताना मी सीआयडी ऑफिस पुणे पाशाण रोड येथे सरेंडर होत, अशी त्यांनी सूरूवातीला माहिती दिली. त्यानंतर संतोष भैय्या देशमुख यांच्या जे कुणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी आणि फाशीची मागणी द्यावी,अशी कराड यांनी मागणी केली. आणि राजकीय द्वेषापोटी माझे नाव त्याच्याशी जोडले जातं आहे. तरी पोलीस तपासात मी दर दोषी आढळलो तर न्यायदेवता जी शिक्षा देईल ती भोगायला तयार आहे, असे शेवटी वाल्मिक कराडने सांगितले.
advertisement
संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचे नाव समोर आले. विरोधकांनी सातत्याने कराडवर टीका केली. कराड हा मंत्री मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात आला होता. प्रकरण आणखीच तापल्यानंतर वाल्मिक कराड गायब झाला होता. त्याचा कसून शोध घेतला जात होता. अखेर वाल्मिक कराडने आज शरणागती पत्करली.
संतोष देशमुख आतापर्यंत चार आरोपीला अटक करण्यात आली होती. तर तीन आरोपी फरार होते. या प्रकरणाचा तपास सीआयडी करत असून गेल्या 4 दिवसांपासून सीआयडीचे वरिष्ठ अधिकारी जिल्ह्यात तळ ठोकून आहेत. या प्रकरणाचा मास्टरमाईंड म्हणून वाल्मिक कराडचे नाव घेतले जात आहे. सीआयडीने वाल्मिक कराडच्या भोवती तपासाचा फास आवळला. संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर वाल्मिक कराडचे नाव घेऊन आरोप होऊ लागले होते. सीआयडीने आपल्या वाल्मिक कराडच्या निकटवर्तीयांची कसून चौकशी सुरू केली होती.
view commentsLocation :
Pune,Maharashtra
First Published :
December 31, 2024 12:26 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Walmik Karad : शरण येताच वाल्मिक कराडने हात जोडले, CID कार्यालयात काय घडलं? पाहा VIDEO










