VIDEO : डीजे, दारू आणि धिंगाणा, बंदी असताना दारू पार्टी करणं अधिकाऱ्यांना भोवलं, 13 जणांना अटक
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्ध्यात दारूबंदी असताना काही अधिकाऱ्यांनी केलेली दारूपार्टी आता वादात सापडली आहे. वर्ध्याच्या पुलंगाव रोडवरील धोत्रा शिवारातील करंडेच्या फॉर्म हाऊसवर ही दारूपार्टी रंगली होती.
Wardha News : नरेंद्र मते, प्रतिनिधी, वर्धा : जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वर्ध्यात दारूबंदी असताना काही अधिकाऱ्यांनी केलेली दारूपार्टी आता वादात सापडली आहे. वर्ध्याच्या पुलंगाव रोडवरील धोत्रा शिवारातील करंडेच्या फॉर्म हाऊसवर ही दारूपार्टी रंगली होती.या दारू पार्टीचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. तसेच या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून ही पार्टी बंद केली होती.त्याचसोबत या पार्टीतून 13 जणांना अटक करण्यात आली आहे.पण पोलिसांनी बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल न केल्याने पोलिसांवर संशयाची सुई येते आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वर्ध्याच्या महात्मा गांधीच्या जिल्ह्यात अधिकाऱ्यांची दारूची पार्टी सूरू होती. पुलंगाव रोडवरील धोत्रा शिवारातील करंडेच्या फॉर्म हाऊसवर ही दारू पार्टी रंगली होती. या पार्टीत भुगाव येथील एवोनिथ कंपनीचे 60 अधिकारी सामील झाले होते. यामध्ये बड्या बड्या अधिकाऱ्यांचा समावेश होता.
या पार्टीत बडे बडे अधिकारी हातात दारूचा ग्लास घेऊन कुणी मटनावर ताव मारत होतं, तर कुणी दारूसोबत स्विमिंग पुलचा आनंद लुटत होतं.तर तिसरा कुणी डिजेच्या तालावर नाचत आणि दारू पितं या पार्टीचा आनंद लुटत होतं. विशेष म्हणजे दिवसाढवळ्या ही दारूपार्टी सूरू होती.त्यामुळे दारूबंदी जिल्ह्यात दारूची पार्टी रंगल्याने खळबळ माजली आहे.
advertisement
दरम्यान या दारूपार्टीची माहिती सावंगी पोलिसांना मिळताच त्यांनी तत्काळ धोत्रा शिवारातील करंडेच्या फॉर्म हाऊसवर छापा टाकला होता.या छाप्याची माहिती मिळताच फॉर्म हाऊस मालक करंडे फरार झाले होते.त्याच्यासोबत अनेक बड्या अधिकाऱ्यांनी पलायन केल्याची माहिती आहे.
या छाप्यात आता सावंगी पोलिसांनी 13 जणांना अटक केली आहे.यासोबत घटनास्थळावरून तीन विदेशी दारूच्या बॉटल आणि 23 खाली दारूच्या शिश्या असा मुद्देमाल केला जप्त केला आहे.तसेच सावंगी पोलीसांनी कारवाईत बड्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल न केल्याने पोलिसांवर संशयाची सुई जात आहे. दरम्यान या घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
October 06, 2025 5:55 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
VIDEO : डीजे, दारू आणि धिंगाणा, बंदी असताना दारू पार्टी करणं अधिकाऱ्यांना भोवलं, 13 जणांना अटक