पोलीस भरती थोडक्यात हुकली, पठ्ठ्यानं थेट सैन्य दलात प्रवेश करत गावाची मान उंचावली
- Published by:News18 Marathi
 
Last Updated:
गुणवत्ता, कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर आपलं स्वप्न पूर्ण करता येतं. 21 वर्षांच्या शेतकरी मुलानं हे दाखवून दिलंय.
वर्धा, 22 सप्टेंबर :  तुमच्याकडे कर्तृत्व असेल तर तुमची पार्श्वभूमी काय आहे याचा फरक पडत नाही. एखाद्या क्षेत्रात आपल्या कर्तुत्वाचा झेंडा रोवायचा असेल तर त्यासाठी अपार कष्ट आणि जिद्द आवश्यक आहे. गुणवत्ता, कष्ट आणि जिद्दीच्या जोरावर आपलं स्वप्न पूर्ण करता येतं. वर्धा जिल्ह्यातल्या 21 वर्षांच्या शेतकरी मुलानं हे दाखवून दिलंय. त्याची नुकतीच सैन्यदलात निवड झालीय.
आदेश कुंडलिक चंदनखेडे असं या शेतकरी पुत्राचं नाव आहे. तो हिंगणघाट तालुक्यातल्या टेंभा या गावचा आहे. त्यानं जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलं. शाळेपासून सैन्यात जाण्याचं त्याचं ध्येय होतो. त्याच्या या स्वप्नाला आई-वडिल, मामांसह प्रशिक्षकांनी देखील साथ दिली.
advertisement
आदेशचा हा प्रवास सहज झालेला नाही. यापूर्वी त्याला एकदा सैन्य भरतीच्या परीक्षेत अपयश आलं होतं. त्यानंतर पोलीस भरतीमध्ये तर फक्त एका मार्कानं त्याची संधी हुकली. या अपयशात मला मामांनी धीर दिला. त्यांनी प्रोत्सहान दिल्यानंच ही निवड झाल्याची भावना आदेशनं व्यक्त केली.
advertisement
आदेशच्या या यशानं त्याच्या गावात आनंदाचं वातावरण आहे. गावकऱ्यांनी ट्रॅक्टरवरुन त्याची मिरवणूक काढत आदेशचा सत्कार केला. आदेशच्या या यशानं गावाचं नाव मोठं झालंय. मुलगा असावा तर असा अशी प्रतिक्रिया ग्रामस्थांनी व्यक्त केलीय.
advertisement
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
September 22, 2023 10:49 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
पोलीस भरती थोडक्यात हुकली, पठ्ठ्यानं थेट सैन्य दलात प्रवेश करत गावाची मान उंचावली

              