Devali Election : 35 वर्षांचा गड उद्धवस्त! खासदाराच्या पत्नीला निवडणुकीत लोकांनी तोंडावर पाडलं

Last Updated:

Devali Nagarparishad Election : देवळी नगरपालिकेत वर्ध्याचे भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस यांचा पराभव झाला आहे. अपक्ष उमेदवार किरण ठाकरे यांनी विजयावर शिक्कामोर्तब केलं.

Devali Nagarparishad Election Result Out Ramdas tadas
Devali Nagarparishad Election Result Out Ramdas tadas
Devali Nagarparishad Election Result : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतून धक्कादायक निकाल समोर आले आहेत. अशातच वर्ध्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत धक्कादायक निकालांची नोंद झाली आहे. मतमोजणीच्या प्रक्रियेनंतर येथील सत्तेची समीकरणे पूर्णपणे बदलल्याचं पाहायला मिळत असून, प्रस्थापित नेत्यांना मतदारांनी मोठा कौल नाकारल्याचे स्पष्ट झालंय. या निवडणुकीत वर्ध्यातील नगराध्यक्षपदाचा तिसरा निकाल लागला असून तो अपक्ष उमेदवाराच्या बाजूने लागला आहे.

देवळीत भाजपला मोठा धक्का

देवळी नगरपालिकेत अपक्ष उमेदवार किरण ठाकरे यांनी विजयावर शिक्कामोर्तब केले आहे. त्यांनी अत्यंत अटीतटीच्या लढतीत विजय मिळवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या निकालात भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे माजी खासदार रामदास तडस यांच्या पत्नी शोभा तडस या नगराध्यक्ष पदासाठी भाजपच्या उमेदवार होत्या, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. एका प्रभावशाली राजकीय घराण्यातील उमेदवाराचा पराभव झाल्याने या निकालाची वर्ध्यात मोठी चर्चा सुरू आहे.
advertisement

35 वर्षाच्या सत्तेला सुरंग

दरम्यान, गेल्या 35 वर्षापासून देवळी नगरपालिकेवर रामदास तडस यांची एकहाती सत्ता होती. अशातच रामदास तडस यांच्या अभेद्य किल्ल्याला सुरंग लागला आहे. रामदास तडस यांनी पत्नीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला होता. या पराभवानंतर आता वर्ध्यात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
Devali Election : 35 वर्षांचा गड उद्धवस्त! खासदाराच्या पत्नीला निवडणुकीत लोकांनी तोंडावर पाडलं
Next Article
advertisement
Dahanu Nagar Parishad Election Result : मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गुलाल उधळला?
मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु
  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

  • मतदारांनी कोणाची 'लंका 'जाळली? डहाणूत मोठा उलटफेर, प्रतिष्ठेच्या लढतीत कोणाचा गु

View All
advertisement