मृत्यूनंतरही 'मार्ग' सापडेना! मृतदेहाचा 'खडतर प्रवास'; वर्ध्यातील काळजाला चटके देणारा VIDEO

Last Updated:

मृत्यूनंतर मृतदेहाचेही हाल होत असल्याचा वर्ध्यातील हा संतापजनक व्हिडीओ आहे.

वर्ध्यात रस्त्याअभावी मृत्यूनंतरही हाल.
वर्ध्यात रस्त्याअभावी मृत्यूनंतरही हाल.
वर्धा, 26 ऑगस्ट :  हे देवा एकदाचं मरण येऊन दे, सगळ्याच कटकटीतून सुटका होईल. आयुष्यातील समस्यांना वैतागलेले कितीतरी लोक असं सहज बोलून जातात.  मृत्यू म्हणजे आयुष्याचा शेवट. सगळ्याच अडचणीतून कायमची सुटका असंच वाटतं. पण वर्ध्यात एका ठिकाणी मात्र हे चित्र वेगळं आहे. इथं मृत्यूनंतर हाल संपले नाहीत. जिवंतपणीच नव्हे तर मृत्यूनंतही एका समस्येचा सामना करावा लागतो आहे. मृतदेहालाही खडतर प्रवास करावा लागतो आहे. काळजाला चटके देणारा हा व्हिडीओ समोर आला आहे.
हिंगणघाट तालुक्यातील खैराटी गावातील ग्रामस्थांची एक समस्या ज्याचा सामना त्यांना जिवंतपणीच नव्हे तर मृत्यूनंतरही करावा लागतो आहे. मन हेलावणारा असा हा व्हिडीओ आहे. जो पाहून तुमचा संतापही होईल. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक अॅम्ब्युलन्स दिसते आहे. अॅम्ब्युलन्समधून काही लोक मृतदेह बाहेर काढतात आणि तो एका बैलगाडीत ठेवतात. आता अॅम्ब्लुलन्स असताना या मृतदेहाला बैलगाडीतून नेण्याची वेळ ओढावली आहे. याचं कारण म्हणजे या गावात रस्ताच नाही.
advertisement
वाघोली ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या खैराटी इथल्या पारधी बेड्यावरील हे दृश्य आहे. इथं पक्का रस्ता नाही त्यामुळे नागरिकांना अशी कसरत करावी लागते.  रस्त्याअभावीच या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबाने केला आहे. रात्री या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आलं पण रस्ता नसल्याने हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळेच आपल्या भावाचा मृत्यू झाला असा आरोप मृताच्या भावाने केला आहे. मृतदेह घरी आणतानाही तो रुग्णालयातून पारधी बेड्यावर आणला. पण पक्का रस्ता नसल्याने गाड्या जात नाहीत. त्यामुळए तो तिथून बैलगाडीतून पुढे न्यावा लागला.
advertisement
या घटनेनंतर प्रशासनाने आता तरी लक्ष द्यावं आणि पक्का रस्ता बांधून द्यावा, अशी मागणी आता ग्रामस्थांकडून केली जाते आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ वर्धा/
मृत्यूनंतरही 'मार्ग' सापडेना! मृतदेहाचा 'खडतर प्रवास'; वर्ध्यातील काळजाला चटके देणारा VIDEO
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement