Nashik Water Supply: नाशिककर आजच भरून घ्या पाणी, शनिवारी संपूर्ण शहरात पाणीबाणी

Last Updated:

Nashik Water Supply: ऐन पावसाळ्यात नाशिककरांना पाणी जपून वापरावं लागेल. शनिवारी 24 तासांसाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

Nashik Water Supply: नाशिककर आजच भरून घ्या पाणी, शनिवारी संपूर्ण शहरात पाणीबाणी
Nashik Water Supply: नाशिककर आजच भरून घ्या पाणी, शनिवारी संपूर्ण शहरात पाणीबाणी
नाशिक: नाशिककरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. शनिवारी स्मार्ट सिटी कंपनीमार्फत फ्लोमीटर बसवण्याची कामे, तसेच पाणीपुरवठा विभागाकडून देखभाल व दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्यामुळे 20 सप्टेंबर रोजी संपूर्ण नाशिक शहराचा पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तसेच रविवारी सकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी शुक्रवारीच भरपूर पाणी भरून ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नाशिक महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने देखभाल, दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. त्यासाठी शनिवारी 24 तासांचा शटडाऊन घेणे अपरिहार्य असून पाणीपुरवठा पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार आहे. तर रविवारी सकाळी पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. यामुळे नागरिकांना या काळात पाणी जपून वापरावे लागेल. तसेच शुक्रवारीच पाण्याचा मुबलक साठा करून ठेवण्याचे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
advertisement
दरम्यान, ऐन पावसाळ्यात नाशिककरांना 2 दिवस पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे. गैरसोय टाळण्यासाठी पाण्याचा साठा करून पाणी जपून वापरावे लागेल. सोमवारपासून नियमित पुरवठा पुन्हा सुरू होईल.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Nashik Water Supply: नाशिककर आजच भरून घ्या पाणी, शनिवारी संपूर्ण शहरात पाणीबाणी
Next Article
advertisement
Shiv Sena Shinde Alliance With MIM: परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम...''
परळीत एमआयएमसोबत शिवसेनेची हातमिळवणी, शिंदेंची पहिली प्रतिक्रिया, ''एमआयएम
  • बीडच्या परळी मध्ये नगरपरिषद निवडणुकीनंतर नवीन समीकरण निर्माण झाले आहे.

  • एमआयएम सोबत अजित पवार गट आणि शिंदे गटाने युती केली आहे.

  • यावर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

View All
advertisement