Sanjay Raut : सोम्या-गोम्या वरून जुंपली, अजितदादांच्या टीकेवर संजय राऊतांचा पलटवार

Last Updated:

अजित पवारांनी संजय राऊतांचा उल्लेख सोम्या-गोम्या असा केला आहे, अजित पवारांच्या या टीकेवर संजय राऊतांनी पलटवार केला आहे.

सोम्या-गोम्या वरून जुंपली, अजितदादांच्या टीकेवर संजय राऊतांचा पलटवार
सोम्या-गोम्या वरून जुंपली, अजितदादांच्या टीकेवर संजय राऊतांचा पलटवार
मुंबई : राष्ट्रवादी शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांच्या शेतकरी आक्रोश मोर्चात महाविकासआघाडीचे नेते सहभागी झाले होते. शनिवारी पुण्यात झालेल्या या सभेतून संजय राऊत यांनी अजित पवारांवर निशाणा साधला होता. अमोल कोल्हेंना कुणीतरी म्हटलं पाडून टाकू, त्यांना सांगा आमच्या पाडापाडीत पडाल तर तुम्हीच पडून जाल. अजितराव टोपी उडेल, हवा बदलली आहे,' असा टोला संजय राऊत यांनी अजित पवारांना लगावला.
संजय राऊतांच्या या टीकेला अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. सोम्या-गोम्याने बोलल्यावर मी उत्तर देत नाही, असं अजित पवार म्हणाले आहेत. दरम्यान अजित पवारांच्या सोम्या-गोम्याच्या या टीकेवर संजय राऊतांनी पुन्हा पलटवार केला आहे.
'त्यांचे सोम्या गोम्या दिल्लीत आहेत, ज्यांनी गुलामी पत्करली आहे किंवा जे डरपोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलू नये. सोम्या गोम्या कोण आहेत 2024 ला कळेल. या महाराष्ट्रावर दिल्लीतून आक्रमण होत असताना, महाराष्ट्रातले उद्योग पळवले जात असताना, महाराष्ट्राचे रोजगार पळवले जात असताना, महाराष्ट्राचा पदोपदी अपमान होत असताना सध्याच्या सरकार मधले हौसे गौसे नवशे तोंडाला कुलूप लावून गप्प आहेत, त्यांना आमच्यावर किंवा इतर कोणावर बोलण्याचा अधिकारच नाही. इतकं नामर्द सरकार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या महाराष्ट्रात नव्हे तर देशाच्या इतिहासात झालेले नाही. डोळ्यासमोर महाराष्ट्र लुटला जातोय तर फक्त आम्ही तुरुंगात जाऊ या भयाने ते लटपटत आहेत', अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sanjay Raut : सोम्या-गोम्या वरून जुंपली, अजितदादांच्या टीकेवर संजय राऊतांचा पलटवार
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement