Weather Update : मुंबई-पुण्यात सर्वात कमी तापमानाची नोंद; राज्यात थंडीची चाहूल

Last Updated:

Mumbai Weather Forecast News Update : मुंबईतही किमान तापमानाचा पारा २४ अंशावरून २० अंशावर घसरला आहे. मुंबईत थंडीचा कडाका जाणवण्यासाठी डिसेंबर किंवा जानेवारीचा पहिला आठवडा उजाडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

News18
News18
मुंबई, 14 डिसेंबर : राज्यात किमान तापमान घसरले असून थंडीची चाहूल लागली आहे. राज्यातील अनेक भगात थंडी जाणवत आहे. दरम्यान, बुधवारी मुंबईतील सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. मुंबईत किमान १९.४ अंश सेल्सियस इतके तापमान होते. यंदाच्या हंगामात दुसऱ्यांदा २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमानाची नोंद झालीय.
याआधी ३० नोव्हेंबरला २० अंश सेल्सिअसपेक्षा कमी तापमान नोंदवले गेले होते. तेव्हा १९.७ अंश सेल्सिअस तापमान नोंद झाले होते. बुधवारी सकाळी सांताक्रूझ इथं १९.४ अंश सेल्सिअस तापमान होते. तर कुलाब्यात २१.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. दिवसभरातही तापमानाचा पारा कमी होता. कुलाब्यात कमाल ३०.८ तर सांताक्रूझमध्ये ३२.४ अंश सेल्सिअस तापमान होते.
advertisement
मुंबई प्रमाणे पुण्यातही कमी तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हंगामात पुण्यातील सर्वात कमी तापमान बुधवारी नोंदवले गेले. डिसेंबर महिन्यात पुणे शहरासह परिसरात कडाक्याची थंडी जाणवते. मात्र यावेळी अद्याप थंडीचा कडाका वाढलेला नाही. बुधवारी १५ अंश किमान तापमानाची नोंद झाली. यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच इतके कमी तापमान नोंद झाल्याची माहिती हवामान विभागाने दिलीय. पुण्यात पुढच्या चार दिवसात तापमानाचा पारा आणखी खाली येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
advertisement
अग्नेय अरबी समुद्रात मालदीव बेटांजवल समुद्रसपाटीपासून ३.१ किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. परिणामी राज्यात आकाश निरभ्र असून पहाटेच्या सुमारास हवेत गारठा वाढला आहे. पहाटे गारठा आणि दुपारी ऊन असं चित्र राज्यात सध्या आहे. पहाटे तुरळक धुकेही पडत आहे. राज्याच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
मुंबईतही किमान तापमानाचा पारा २४ अंशावरून २० अंशावर घसरला आहे. मुंबईत थंडीचा कडाका जाणवण्यासाठी डिसेंबर किंवा जानेवारीचा पहिला आठवडा उजाडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्याचे किमान तापमान हे डिसेंबरच्या सरासरी पातळीवर आलेले नाही. राज्यात सध्याचं तापमान हे १५ ते १७ अंश सेल्सिअस इतकं आहे. हे सरासरीपेक्षा २ अंश सेल्सिअसने जास्त आहे. उत्तरेकडे बर्फवृष्टीला सुरुवात झाल्यानंतर डिसेंबर अखेरीस किंवा त्यानंतर मुंबईत थंडी जाणवेल असं हवामान विभागाने म्हटलंय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Update : मुंबई-पुण्यात सर्वात कमी तापमानाची नोंद; राज्यात थंडीची चाहूल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement