Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढणार, मुंबई-पुणे गारठले; या ठिकाणी निचांकी तापमानाची नोंद

Last Updated:

उत्तर भारताता तापमानाचा पारा बराच खाली घसरला आहे. पंजाब, हरयाणा, चंडिगड, दिल्ली या राज्यात तापमान ४ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे.

News18
News18
मुंबई, 17 डिसेंबर : उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला असून आता महाराष्ट्रातही गारठा जाणवू लागला आहे. राज्यात अनेक भागात पहिल्यांदाच तापमानाचा पारा यंदाच्या हंगामात निचांकी पातळीवर पोहोचला आहे. मुंबईत शनिवारी निचांकी तापमानाची नोंद झाली. मुंबईत किमान तापमानाचा पारा १९.४ अंश सेल्सिअसवर पोहोचला होता. तर पुण्यात पाषाण आणि हवेली इथं १०.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले. पुढचे तीन दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा १३ अंश सेल्सिअस पेक्षा खाली पोहोचला असल्याचंही हवामान विभागाने सांगितलं. अहमदनगरच्या जेऊर इथं १०.१ अंश सेल्सिअस तर परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ११ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. यवतमाळमध्ये ११.५ आणि निफाडमध्ये ११.६ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले.
advertisement
उत्तर भारताता तापमानाचा पारा बराच खाली घसरला आहे. पंजाब, हरयाणा, चंडिगड, दिल्ली या राज्यात तापमान ४ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले आहे. पंजाबच्या अमृतसर आणि लुधियानामध्ये सर्वात निचांकी ४ अंश सेल्सिअस तापमान नोंदवले गेले आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा थंडीचं वातावरण निर्माण झालं आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Update : राज्यात थंडीचा कडाका वाढणार, मुंबई-पुणे गारठले; या ठिकाणी निचांकी तापमानाची नोंद
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement