advertisement

Weather Update : राज्यात थंडीची चाहूल, 4-5 दिवसात तापमानाचा पारा घसरणार; हवामान विभागाचा अंदाज

Last Updated:

राज्यात सध्याचं तापमान हे १५ ते १७ अंश सेल्सिअस इतकं आहे. हे सरासरीपेक्षा २ अंश सेल्सिअसने जास्त आहे.

News18
News18
मुंबई, 13 डिसेंबर : राज्यातील तापमान आता कमी होत चालले असून थंडीची चाहूल लागली आहे. उत्तर महाराष्ट्रासह विदर्भात किमान तापमानात घट होताना दिसत आहे. चंद्रपूरमध्ये १३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. अग्नेय अरबी समुद्रात मालदीव बेटांजवल समुद्रसपाटीपासून ३.१ किमी उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. परिणामी राज्यात आकाश निरभ्र असून पहाटेच्या सुमारास हवेत गारठा वाढला आहे. पहाटे गारठा आणि दुपारी ऊन असं चित्र राज्यात सध्या आहे. पहाटे तुरळक धुकेही पडत आहे. राज्याच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता आहे.
पुण्यात किमान तापमानात घट होण्याची शक्यता असून ते येत्या आठवड्याभरात १४ अंश सेल्सिअसपर्यंत खाली येऊ शकते. मंगळवारी पुण्यात १६ अंश सेल्सिअयस किमान तापमानाची नोंद झाली. शहर आणि उपनगरांमध्ये गारठा वाढत आहे. सूर्यास्तानंतर तापमानात होणारी घट पहाटेपर्यंत कायम राहतेय. गेल्या आठवड्यात किमान तापमान १७ ते १८ अंश सेल्सिअस इतकं होतं. ते १५.७ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झालं. मात्र सरासरीपेक्षा ४ अंश सेल्सिअसने हे तापमान कमी असल्याची माहिती हवामान विभागाने दिलीय.
advertisement
मुंबईतही किमान तापमानाचा पारा २४ अंशावरून २० अंशावर घसरला आहे. मुंबईत थंडीचा कडाका जाणवण्यासाठी डिसेंबर किंवा जानेवारीचा पहिला आठवडा उजाडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सध्याचे किमान तापमान हे डिसेंबरच्या सरासरी पातळीवर आलेले नाही. राज्यात सध्याचं तापमान हे १५ ते १७ अंश सेल्सिअस इतकं आहे. हे सरासरीपेक्षा २ अंश सेल्सिअसने जास्त आहे. उत्तरेकडे बर्फवृष्टीला सुरुवात झाल्यानंतर डिसेंबर अखेरीस किंवा त्यानंतर मुंबईत थंडी जाणवेल असं हवामान विभागाने म्हटलंय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Weather Update : राज्यात थंडीची चाहूल, 4-5 दिवसात तापमानाचा पारा घसरणार; हवामान विभागाचा अंदाज
Next Article
advertisement
BMC Mayor Election: महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटानं घेतला मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक्का, ठाकरेंना दिलासा?
महापौर निवडीआधी मोठी घडामोड, शिंदे गटाचा मोठा निर्णय, भाजपच्या रणनीतिला धक
  • भाजप आणि शिंदे सेना यांच्यातील अंतर्गत हालचालींना वेग आला आहे.

  • महापौर निवडीसाठी काठावरचं बहुमत असलेल्या भाजप-शिंदे गटामध्ये सत्ता वाटपावर चर्चा

  • सत्ता संघर्षाच्या दरम्यान शिवसेना शिंदे गटाने महत्त्वाचा निर्णय घेतला

View All
advertisement