advertisement

राज ठाकरे आणि एकानाथ शिंदेंच्या भेटीत काय चर्चा झाली? बंगल्यावरची Inside स्टोरी समोर

Last Updated:

शिंदेंच्या बालेकिल्ल्यात सेना-मनसेचे सूर जुळले, यानंतर दोन्ही नेत्यांची झालेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.

News18
News18
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहे. ठाण्यातील नंदनवन बंगल्यावर एकनाथ शिंदेंची भेट घेतली. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंच्या या भेटीमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. गेल्याच वर्षी ठाकरे बंधूंची युती झाली. महापालिका निवडणुकांमध्ये ठाकरे बंधूंच्या एकत्रित सभा झाल्या. त्यात दोन्ही भावांनी महायुती सरकारच्या कारभारावर सडकून टीका केली. पण महापालिका निवडणुकांचे निकाल लागताच कल्याण-डोंबिवलीत मनसेनं शिंदेसेनेला पाठिंबा दिला. शिंदेंच्या बालेकिल्ल्यात सेना-मनसेचे सूर जुळले. यानंतर दोन्ही नेत्यांची झालेली भेट महत्त्वाची मानली जात आहे.
राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गाठीभेटी, बैठका याआधीही झालेल्या आहेत. पण ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर राज ठाकरे प्रथमच एकनाथ शिंदे यांच्या भेटीला गेले आहेत. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतरची ही पहिली भेट आहे. विधानसभा निवडणुकीनंतर खरं तर शिवसेना आणि मनसे यांच्या युतीच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र राज ठाकरे यांनी मोठे बंधू उद्धव ठाकरे यांना टाळी देत शिवसेना ठाकरे गट आणि मनसे यांची युती केली. पण ठाकरे बंधूंच्या युती नंतरही मनसे पक्षाला निवडणुकीत अपेक्षित यश काही मिळाले नाही.
advertisement

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर पहिली भेट

त्यामुळे आज एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात होत असलेल्या बैठकीत राजकीय चर्चा होणारच यात शंका नाही. त्यातच कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक निकालानंतर मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला पाठिंबा देत मोठा उलटफेर केला आहे. त्यामुळे आता मुंबई महापालिकेतील मनसेचे 6 नगरसेवक पुढील पाच वर्षात काय भूमीका घेणार याकडे देखील सर्वांचे लक्ष लागलं होते. दरम्ययान एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीची आतली बातमी समोर आली आहे.
advertisement

भेटीत नेमकं काय घडलं? 

राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात सुमारे अर्धा ते पाऊण तास चर्चा झाली. ही भेट 'सदिच्छा भेट' असल्याचे सांगण्यात येत असले तरी, चर्चेचा मुख्य विषय कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणुकीत मनसेच्या नगरसेवकांनी शिवसेनेला दिलेल्या पाठिंब्या बद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार मानले. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना महापालिका सभागृहातील कामकाजात मनसेचे सहकार्य राहील असे आश्वासन दिले आहे.
advertisement

राज ठाकरेंनी केले कौतुक

तसेच यावेळी त्यांच्यासोबत विविध विषयावर चर्चा झाली. तसेच नंदनवन या बंगल्याच्या हेरिटेज वास्तूचे वेगळेपण जपत केलेल्या सुधारणांचे राज ठाकरे यांनी विशेष कौतुक केले. या बंगल्यात लावलेल्या मुंबईतील जुन्या हेरिटेज वास्तूंच्या फोटो फ्रेम्सची बारकाईने पाहणी केली, आणि जुन्या मुंबईच्या आठवणींना उजाळा दिल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी सोशल मीडियावर दिली.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
राज ठाकरे आणि एकानाथ शिंदेंच्या भेटीत काय चर्चा झाली? बंगल्यावरची Inside स्टोरी समोर
Next Article
advertisement
Rohit Pawar On Ajit Pawar Plane Crash : पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर मुद्दे!
पायलट सुमित कपूरला कोणी केलं ब्लॅकमेल? रोहित पवारांनी पुराव्यासह मांडले १० गंभीर
  • रोहित पवार यांनी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात दुस

  • विमानाच्या पायलटला ब्लॅकमेल करण्यात आले होते का, असा थेट सवाल

  • रोहित पवार यांनी पायलट सुमित कपूर यांच्याबाबत काही मुद्दे उपस्थित केले.

View All
advertisement