बडगुजर, महाजनांवर पडला भारी! ठाकरे बंधूंचा पाठिंबा मिळवला अन् ठरला जायंट किलर

Last Updated:

Nashik Election 2025 : नाशिक महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आज (दि. १६ जानेवारी) जाहीर झाला असून, शहरातील सर्वात हायव्होल्टेज ठरलेल्या लढतीत अपक्ष उमेदवार मुकेश सहाणे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे.

nashik election 2025
nashik election 2025
नाशिक :  महानगरपालिका निवडणुकीचा निकाल आज (दि. १६ जानेवारी) जाहीर झाला असून, शहरातील सर्वात हायव्होल्टेज ठरलेल्या लढतीत अपक्ष उमेदवार मुकेश सहाणे यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. प्रभाग क्रमांक २९ मधून त्यांनी भाजपचे अधिकृत उमेदवार दीपक बडगुजर यांचा पराभव केला असून, या निकालाने नाशिकच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. गुरुवारी (दि. १५) मतदान प्रक्रिया पार पडली होती आणि अवघ्या एका दिवसात या अटीतटीच्या लढतीचा निकाल समोर आला. या पार्श्वभूमीवर मुकेश सहाणे यांची राजकीय वाटचाल पुन्हा एकदा चर्चेत आली आहे.
कोण आहेत मुकेश सहाणे?
मुकेश सहाणे हे नाशिकच्या स्थानिक राजकारणात परिचित नाव आहे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपमधून केली होती. संघटनात्मक बांधणी, स्थानिक प्रश्नांवरील आक्रमक भूमिका आणि जनसंपर्क यामुळे ते भाजपमध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. प्रभागातील विविध नागरी समस्या, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि रस्त्यांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला होता. त्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर चांगला जनाधार मिळाला.
advertisement
पक्षाने तिकीट नाकारलं
यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळेल, अशी सहाणेंना अपेक्षा होती. मात्र, पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला. भाजपच्या निर्णयाविरोधात थेट अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. या निर्णयामुळे भाजपने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईही केली. तरीही सहाणे आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि जनतेच्या जोरावर निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी कायम ठेवला.
advertisement
या निवडणुकीत एकूण ७३५ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये ५२७ राजकीय पक्षांचे उमेदवार तर २०८ अपक्ष उमेदवार होते. मात्र, या सर्वांमध्ये प्रभाग क्रमांक २९ ची लढत सर्वाधिक लक्षवेधी ठरली. अपक्ष मुकेश सहाणे आणि भाजपचे दीपक बडगुजर यांच्यात थेट सामना रंगला. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार झाला आणि प्रभागात राजकीय वातावरण चांगलेच तापले.
advertisement
बडगुजरांवर पैसे वाटपाचा आरोप
मतदानाच्या दिवशी सावतानगर परिसरात पैसे वाटप होत असल्याच्या अफवेमुळे मोठा गोंधळ उडाला. माजी आमदार सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर रोख रक्कम वाटली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर परिसरात नागरिकांची गर्दी जमली. या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला आणि ही बाब संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरली.
ठाकरे बंधूंचा पाठिंबा
मुकेश सहाणे यांना दोन्ही ठाकरे बंधूंचा म्हणजेच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांचा जाहीर पाठिंबा मिळाला. या पाठिंब्यामुळे सहाणेंची ताकद आणखी वाढली. भाजपमधून बाहेर पडल्यानंतरही त्यांनी आपल्या राजकीय प्रभावाला कमी होऊ दिले नाही, हे या निवडणुकीतून स्पष्ट झाले.
Click here to add News18 as your preferred news source on Google.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बडगुजर, महाजनांवर पडला भारी! ठाकरे बंधूंचा पाठिंबा मिळवला अन् ठरला जायंट किलर
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement