Women Health: महिलांनो आरोग्याच्या बाबतीत ही चूक पडेल महागात, जीवही जाऊ शकतो
- Published by:Vrushali Kedar
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
Last Updated:
Women Health: बहुतांशी महिला घर आणि नोकरी यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहेत.
ठाणे: सध्याच्या काळात महिला एकाचवेळी अनेक आघाड्यांवरती लढण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजेच बहुतांशी महिला घर आणि नोकरी यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान त्या स्वत:ला एक चांगली पत्नी, आई, सून आणि कर्मचारी म्हणून सिद्ध करण्यासाठी कसरत करतात. यासर्व गोंधळामध्ये त्या स्वत:च्या आरोग्यकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. किंबहुना त्यांना लक्ष देण्यासाठी वेळही मिळत नाही. मात्र, हीच बाब त्यांच्या एकूण आरोग्यासाठी फार घातक ठरत असल्याचं दिसत आहेत.
अनेक महिला मासिक पाळी, गर्भधारणा, मेनोपॉज, हृदयविकार, मधुमेह, कर्करोग आणि मानसिक आजार यांसारख्या समस्यांचा सामना करत आहेत. या समस्या टाळण्यासाठी महिलांनी आपली दिनचर्या आणि आहाराकडे लक्षं दिलं पाहिजे.
सर्वसाधारणपणे, व्यायाम करणाऱ्या महिलांमध्ये रक्तदाब आणि कोलेस्टेरॉलची पातळी सामान्य असते. त्यांना हृदयरोग, मधुमेह आणि स्मृतिभ्रंश यांसारखे गंभीर आजार होण्याचा धोका देखील कमी असतो. त्यामुळे दैनंदिन कामातून थोडासा वेळ काढून व्यायाम, योगासने आणि मेडिटेशन केलं पाहिजे, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
advertisement
शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये योग्य आहार देखील महत्त्वाची भूमिका बजावतो. सध्या जंकफूड आणि पॅकिंगचे पदार्थ खाण्याचं प्रमाण वाढलं आहे. याचा स्त्रियांच्या हार्मोन्सवर परिणाम होतो. अयोग्य आहारामुळे विशेषत: मासिकपाळीच्या समस्या निर्माण होतात. अगदी कमी वयात देखील मासिक पाळीच्या समस्या निर्माण होत आहेत. बहुतांशी महिला मासिक पाळीतील अनियमितता आणि जास्त रक्तस्रावाच्या समस्येकडे दुर्लक्ष करतात. मात्र, ही बाब जीवघेणी देखील ठरू शकते. त्यामुळे लग्न झालेली स्त्री असो किंवा मुलगी प्रत्येकीने आपल्या आरोग्याबाबत जागरूक असणं गरजेचं आहे.
Location :
Thane,Maharashtra
First Published :
September 25, 2025 4:15 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Women Health: महिलांनो आरोग्याच्या बाबतीत ही चूक पडेल महागात, जीवही जाऊ शकतो