Women Reservation : केंद्रानंतर महाराष्ट्रातही महिला आरक्षण, मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे?
- Published by:Shreyas
Last Updated:
केंद्रातल्या मोदी सरकारने लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक मांडलं, त्याचप्रमाणे राज्यातही महिला आरक्षण विधेयक आणलं जाईल, असा विश्वास विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे.
चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी
पुणे, 19 सप्टेंबर : केंद्रातल्या मोदी सरकारने लोकसभेमध्ये महिला आरक्षण विधेयक मांडलं, त्याचप्रमाणे राज्यातही महिला आरक्षण विधेयक आणलं जाईल, असा विश्वास विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केला आहे. तसंच नीलम गोऱ्हे यांनी महिला आरक्षण विधेयक मांडल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. स्त्रीयांना समान संधी मिळाली तर त्या नक्कीच स्वत:ला सिद्ध करतील, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या आहेत.
advertisement
महिला आरक्षण विधेयकाला विधानसभा आणि विधानपरिषदेतही मान्यता दिली जाणार आहे. यासंदर्भात मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलले आहे, त्यांनीही आपला या विधेयकाला पाठिंबा असल्याचं सांगितलं. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली हे विधेयक मंजूर होईल अशी मला खात्री वाटते. महाराष्ट्रातही हा कायदा लागू होण्याच्याबाबतीत पावलं उचलली जावीत, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
advertisement
किती होणार आमदार-खासदारांची संख्या?
view commentsमहिलांना 33 टक्के आरक्षण देणारं विधेयक कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी नव्या संसद भवनामध्ये सादर केलं. 2019 ला झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये 78 महिला खासदार निवडून गेल्या. महिला आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर झालं तर 2024 च्या निवडणुकांमधून 181 महिला खासदार निवडून येतील. तर 2019 महाराष्ट्र विधानसभेमध्ये 24 महिला आमदार जिंकून आल्या. अंधेरी पूर्वच्या पोटनिवडणुकीत ऋतुजा लटके यांचा विजय झाल्यानंतर हीच संख्या 25 झाली. महिला आरक्षण विधेयक पास झाल्यानंतर 2024 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर महिला आमदारांची संख्या 96 होईल. महिला आरक्षण विधेयकामध्ये 33 टक्के आरक्षणामध्येच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि एंग्लो इंडियन महिलांना एक तृतियांश जागा आरक्षित असतील.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
September 19, 2023 6:35 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Women Reservation : केंद्रानंतर महाराष्ट्रातही महिला आरक्षण, मुख्यमंत्र्यांशी बोलल्यानंतर काय म्हणाल्या नीलम गोऱ्हे?









