धावत्या दुचाकीवर झाड कोसळलं; विद्यार्थ्याचा मृत्यू, गोंदियातील धक्कादायक घटना
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
झाड अंगावर कोसळून तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गोंदियामधून समोर आली आहे.
गोंदिया, रवी सपाटे, प्रतिनिधी : गोंदियामधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, अंगावर झाड पडल्यानं विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. गोंदियाच्या सालेकसा तालुक्यातील सुरजटोला परिसरात ही घटना घडली आहे. दानेश्वर अडले असं मृत तरुणाचं नाव आहे. धावत्या दुचाकीवर झाड अंगावर कोसळून दानेश्वरचा मृत्यू झाला आहे. तर दुचाकीवरील दुसरा तरुण इश्वर प्रेमलाल उईके (वय १९) हा थोडक्यात बचावला.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील हलबीटोला ते सुरजाटोला मार्गावर धावत्या दुचाकीवर अचानक झाड कोसळलं. या घटनेत एकाचा मृत्यू झाला आहे. दानेश्वर अडले (१९) असे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.
तो आपल्या मित्रासोबत सालेकसा येथील आदिवासी वस्तीगृहात जात असताना अचानक धावत्या दुचाकीवर झाडं कोसळलं. हे झाडं जेव्हा कोसळलं तेव्हा दानेश्वर अडले हा दुचाकीवर मागे बसला होता, तर त्याचा मित्र इश्वर प्रेमलाल उईके (वय १९) हा गाडी चालवत होता. हे झाड मागे बसलेल्या दानेश्वर अडले याच्या अंगावर कोसळलं. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला तर त्याचा मित्र इश्वर उईके हा थोडक्यात वाचला आहे. सदर घटनेची माहिती मिळताच सालेकसा तहसीलदार नरसय्या गोंडागुर्ले घटनास्थळी दाखल झाले. दानेश्वर अडले याचा मृतदेह सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
Location :
Gondiya,Gondiya,Maharashtra
First Published :
September 07, 2024 10:15 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
धावत्या दुचाकीवर झाड कोसळलं; विद्यार्थ्याचा मृत्यू, गोंदियातील धक्कादायक घटना