'चल तुला खाऊ देतो', आमिष दाखवलं पण पोरीने वेळीच ओळखलं, आरडाओरड केला अन् गावाने...
- Published by:Prachi Amale
- Reported by:Dnyaneshwar Pandurang Salokhe
Last Updated:
नागरिकांनी आरोपीला घटनास्थळीच पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिल्याने मोठा अनर्थ टळला.
कोल्हापूर :मालेगाव, मनमाड येथे अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची घटना ताजी असताना कोल्हापूरमध्ये एक भयंकर प्रकार समोर आला आहे. खाऊचे आमिष दाखवत एका तरुणाने मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. सतर्क नागरिकांनी आरोपीला घटनास्थळीच पकडून बेदम चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिल्याने मोठा अनर्थ टळला.
मिळालेल्या माहितीनुसार, कात्यायनी गिरगाव रस्त्यावरील परिसरात संबंधित मुलगी घरासमोर उभी असताना आरोपी तरुणाने तिच्याशी बोलण्याचा बहाणा करत तिला खाऊ घेऊन देतो म्हणून जवळ बोलावलं आणि जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. अचानक झालेल्या या प्रकाराने मुलगी घाबरली आणि तिने मुलीने आरडाओरड केली. तिच्या आवाजाने स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत आरोपीला पकडले.
आरोपीला बेदम धुतलं
advertisement
घटनास्थळी जमा झालेल्या नागरिकांनी आरोपीला चोप देत पोलिसांना कळवले. पोलिसांनी तत्काळ ताबा घेत त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीची प्राथमिक चौकशी सुरू असून, त्याचे अन्य कोणत्याही प्रकरणांशी संबंध आहेत का, याचीही माहिती घेतली जात आहे.
पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज
दरम्यान, आठवडाभरापूर्वी याच भागात एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण होते. सलग दोन घटना घडल्याने स्थानिक नागरिकांत संताप व्यक्त होत असून, या भागात पोलिस गस्त वाढवावी, अशी मागणी रहिवाशांकडून केली जात आहे. या प्रकरणाने पुन्हा एकदा अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून, पालकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज आहे.
advertisement
मनमाडमध्ये अल्पवयीन मुलावर अत्याचार
64 वर्षीय बाबा भागवत या आरोपीला अटक करून त्याच्या विरुद्ध ऍट्रॉसिटी आणि पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या नराधमाने एका 7 वर्षीय मुलावर अत्याचार केला शिवाय त्याची शहरातील एका भागात असलेली लॉन्ड्रीच्या दुकानात प्रेस करण्यासाठी कपडे घेऊन येणाऱ्या लहान मुलांशी अश्लील चाळे करून लैंगिक अत्याचार करीत असल्याचे डिवायएसपी बाजीराव महाजन यांनी सांगितले. आरोपी बाबाचे लॉन्ड्रीचे दुकान आहे. या दुकानात जी लहान मुले कपडे घेऊन येत असे त्या मुलांसोबत अश्लील चाळे करणे, त्यांना जवळ घेणे,अनैसर्गिक पद्धतीचे चाळे करत असे. हे प्रकरण समोर आल्यानंतर फिर्यादीने पोलीस स्थानकात धाव घेतली. पोलिसांनी तात्काळ नराधमाला अटक केली असून फॉरेन्सिक टीमला पाचारण केले. फॉरेन्सिक टीमने पुरावे गोळा केले असून आरोपीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.
view commentsLocation :
Kolhapur,Maharashtra
First Published :
December 09, 2025 4:49 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
'चल तुला खाऊ देतो', आमिष दाखवलं पण पोरीने वेळीच ओळखलं, आरडाओरड केला अन् गावाने...


