एकट्याला गाठलं अन् सपासप वार करून तरुणाला संपवलं, जळगावमधील धक्कादायक घटना

Last Updated:

जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. बाळकृष्ण कोळी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे. 

News18
News18
विजय वाघमारे, प्रतिनिधी
जळगाव : राज्यातील निवडणुकीची धामधूम सुरू आहे. अशातच जळगावमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे.  जुन्या वादातून एका तरुणाची निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे जळगाव शासकीय रुग्णालय आणि महाविद्यालाच्या परिसरात तणावाचे वातावरण आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  जळगाव तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे.   बाळकृष्ण कोळी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे.  बाळकृष्ण कोळी हे रस्त्याने जात होते. त्यावेळी अज्ञात तरुणांनी त्यांच्यावर हल्ला केला. कोयता आणि धारदार शस्त्राने कोळी यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर कोळी हे घटनास्थळावर कोसळले होते.
advertisement
घटनेची माहिती स्थानिकांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करण्यात आला.  गंभीर जखमी अवस्थेत बाळकृष्ण कोळी यांना तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात दाखल करण्यात आलं.  मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मयत घोषित केलं.
घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात नातेवाईकांची मोठी गर्दी झाली असून तणावाचे वातावरण निर्माण झाले. खुनाचे नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. परंतु, कोयत्याने वार केल्यामुळे हा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जुन्या वादातून ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहे.  तसंच आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची पथकं तैनात केली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
एकट्याला गाठलं अन् सपासप वार करून तरुणाला संपवलं, जळगावमधील धक्कादायक घटना
Next Article
advertisement
What is PADU:  राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत क
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

View All
advertisement