IND vs NZ : 'जर तुम्ही सुधारला नाहीत तर...', कॅप्टन गिलने 'या' खेळाडूंवर फोडलं पराभवाचं खापर
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
टीम इंडियाच्या या पराभवानंतर बोलताना शुभमन गिलने सतंप्त प्रतिक्रिया दिली आहे. तसेच पराभवाला कारणीभूत ठरलेल्या खेळाडूंवर तो बोलून गेला आहे.
advertisement
आम्हाला मधल्या षटकांमध्ये एकही विकेट मिळाली नाही. पाच क्षेत्ररक्षक आत असताना, जर तुम्ही मधल्या षटकांमध्ये विकेट्स घेत राहिला नाहीत, तर आम्ही १५-२० धावा जास्त केल्या असत्या तरी खूप अवघड होते. आणि जर तुम्ही मधल्या षटकांमध्ये विकेट्स घेतल्या नाहीत, तर लक्ष्य रोखणे खूप कठीण होते,असे शुभमन गिलने सांगितले आहे.
advertisement
advertisement
advertisement
शेवटी, आम्ही एक चांगले लक्ष्य उभारले आणि पहिल्या १० षटकांमध्ये आम्ही खूप चांगली गोलंदाजी केली. आणि गोलंदाजीत आम्हाला जशी सुरुवात मिळाली, त्यानुसार आम्ही त्यांना रोखण्याचा, त्यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत होतो, पण मला वाटते की त्यांनी मधल्या षटकांमध्ये खूप चांगली फलंदाजी केली,असे कौतुक ही शुभमन गिलने केले आहे.
advertisement
advertisement
तसेच मागच्या सामन्यातही आम्ही काही संधी गमावल्या. ही एक अशी गोष्ट आहे की, आम्ही नेहमीच, विशेषतः या संघासोबत, क्षेत्ररक्षणात सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो. हा एक असा पैलू आहे ज्यामध्ये आम्ही नेहमीच सुधारणा करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हो, जर तुम्ही संधी साधल्या नाहीत, तर या फॉरमॅटमध्ये तुम्हाला नेहमीच पराभव पत्करावा लागतो,असे देखील शुभमन गिलने सांगितले.









