पैसे आणि मिक्सर मशीन वाटताना भाजपच्या कार्यकर्त्यांना पकडलं, लोकंही तुटून पडली, VIDEO
- Published by:Sachin S
Last Updated:
पुण्यात वॉशिंग मशीन वाटपाचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता मुंबईत चक्क मिक्सर वाटप करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून भाजपचे कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडलं आहे.
विजय वंजारा, प्रतिनिधी
मुंबई: राज्यात महापालिका निवडणुकीसाठी मतदान आता काही तासांवर येऊन ठेपलं आहे. पण, राज्याभरात सर्रासपणे पैशांचा वाटप सुरू आहे. ठिकठिकाणी पैसे वाटप करताना कार्यकर्ते सापडत आहे. पुण्यात वॉशिंग मशीन वाटपाचा प्रकार समोर आला होता. त्यानंतर आता मुंबईत चक्क मिक्सर वाटप करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून भाजपचे कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडलं आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील दहिसर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील वॉर्ड क्रमांक ३ मध्ये मतदानाच्या बदल्यात रोख रक्कम आणि मिक्सर मशीन वाटताना भाजप कार्यकर्ते पकडले आहे. दहिसर पोलिसांनी काही भाजप आणि काँग्रेस नेत्यांवर कारवाई केली आहे. पुढील चौकशी सुरू आहे.
संध्याकाळच्या सुमारास एक टेम्पो रस्त्याच्या बाजूला उभा होता. या टेम्पोबाहेर मोठ्या प्रमाणात लोकांनी गर्दी केली होती. या टेम्पोमधून मिक्सर वाटले जात होते. हा प्रकार लक्षात येताच स्थानिक कार्यकर्त्यांनी धाव घेतली. घटनेची माहिती पोलीस आणि निवडणूक अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यांनी या ठिकाणी पोहोचून भाजपच्या कार्यकर्त्याांना पकडलं.
advertisement
या कार्यकर्त्यांकडून टेम्पो आणि मिक्सरचे बॉक्स आदी साठा जप्त केला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
या भागामध्ये भाजपकडून प्रकाश दरेकर, काँग्रेसकडून प्रदीप चौबे आणि समाजवादी पक्षाकडून प्रसाद गुप्ता
तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून मनीष दुबे निवडणूक रिंगणात आहेत. हा वॉर्ड भाजपसाठी प्रतिष्ठेचा बनला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jan 14, 2026 10:50 PM IST
मराठी बातम्या/मुंबई/
पैसे आणि मिक्सर मशीन वाटताना भाजपच्या कार्यकर्त्यांना पकडलं, लोकंही तुटून पडली, VIDEO








