Pune : नाईट ड्युटीवरून आला मुलगा, घरात येताच दिसला आई-वडिलांचा मृतदेह, पुणे हादरलं

Last Updated:

पुण्यातील एका सुखी कुटुंबाचं आयुष्य एक क्षणात उद्ध्वस्त झालं आहे. नाईट ड्युटीवरून परत आलेल्या मुलाला घरामध्ये आई-वडिलांचे मृतदेह आढळून आले.

नाईट ड्युटीवरून आला मुलगा, घरात येताच दिसला आई-वडिलांचा मृतदेह, पुणे हादरलं
नाईट ड्युटीवरून आला मुलगा, घरात येताच दिसला आई-वडिलांचा मृतदेह, पुणे हादरलं
पुणे : पुण्यातील एका सुखी कुटुंबाचं आयुष्य एक क्षणात उद्ध्वस्त झालं आहे. पुण्याच्या कोंढवा भागात राहणाऱ्या पती-पत्नीने आयुष्य संपवल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या दाम्पत्याचा 23 वर्षांचा मुलगा नेहमीप्रमाणे नाईट ड्युटीवर गेला होता, पण ती रात्र त्याच्या आयुष्यातील सगळ्यात काळोखी रात्र असेल, याची कल्पनाही त्याला नव्हती. मुलगा सकाळी घरी परतल्यावर त्याने दारावरची बेल वाजवली, पण बराच वेळ कोणी दार उघडलं नाही, यानंतर त्याने शेजाऱ्यांना बोलावलं आणि दरवाजा तोडला.
दार तोडल्यानंतर मुलाने घरामध्ये प्रवेश केला, तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्याच्या तोंडातून किंकाळ्या यायला सुरूवात झाली. मुलाचे वडील प्रकाश मुंडे (वय 52) आणि आई ज्ञानेश्वरी मुंडे (वय 48) यांचे मृतदेह घरामध्ये पडले होते. या दाम्पत्याचा मृत्यू कशामुळे झाला? या दोघांनी खरंच आयुष्य संपवले? का यामागे काही घातपात आहे? याचा तपास पोलीस करत आहेत.
advertisement
पत्नीला ब्रेन ट्युमर
प्रकाश मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी यांना ब्रेन ट्यूमर होता. प्रकाश मुंडे व्यवसायाने ड्रायव्हर होते. घर चालवण्यासाठी दिवसभर गाडी चालवण्याचा ताण आणि पत्नीच्या महागड्या वैद्यकीय उपचारांमुळे त्यांना मानसिक त्रास होत होता. ज्ञानेश्वरी गेल्या वर्षभरापासून उपचार घेत होत्या. येवलेवाडी पोलिस ठाण्यातील वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमर काळंगे यांच्या मते, पोलिसांनी या प्रकरणात अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.
advertisement
त्यांचा 23 वर्षीय मुलगा गणेश मुंडे पुण्यातील एका खाजगी कंपनीत रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतो. गणेशने पोलिसांना सांगितले की त्याचे वडील त्यांच्या पत्नीची काळजी घेण्यात व्यस्त असल्याने घरात सहसा शांतता असायची. त्या रात्री जेव्हा तो त्याच्या रात्रीच्या शिफ्टसाठी निघाला तेव्हा सर्व काही सामान्य वाटत होते. शेजाऱ्यांनी सांगितले की मुंडे कुटुंब खूप साधे आणि मैत्रीपूर्ण होते. त्यांनी कधीही कोणतेही भांडण किंवा वाद ऐकले नाहीत. प्रकाश मुंडे अनेकदा त्यांच्या पत्नीसोबत आधार म्हणून फिरताना दिसले.
advertisement
येवलेवाडी पोलिसांना घटनास्थळी कोणतीही नोट सापडली नाही. आजारपणाच्या ताणामुळे या आनंदी कुटुंबाचा नाश झाला का? याचा तपास पोलीस करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
Pune : नाईट ड्युटीवरून आला मुलगा, घरात येताच दिसला आई-वडिलांचा मृतदेह, पुणे हादरलं
Next Article
advertisement
What is PADU:  राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत कधी होणार वापर
राज ठाकरेंसह विरोधकांनी आक्षेप घेतलेली PADU मशीन आहे तरी काय? बीएमसी निवडणुकीत क
  • मुंबई महापालिकेच्या निवडणुकीचे मतदान आता काही तास उरले आहेत.

  • निवडणूक आयोगाकडून पाडू (PADU) या यंत्राचा वापर करण्यात येणार आहे.

  • राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर सडेतोड टीका केली.

View All
advertisement