advertisement

ZP Election: सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ मिळाली, मग आता झेडपी निवडणूक किती टप्प्यात होणार? समोर आली अपडेट

Last Updated:

ZP Election Dates: सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला सोमवारी मोठा दिलासा दिला. निवडणुकांचे आयोजन आणि तयारी करण्यासाठी न्यायालयाने आयोगाला वाढीव १५ दिवसांची मुदत दिली.

Rapid Read
सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ मिळाली, मग आता झेडपी निवडणूक किती टप्प्यात होणार? समोर आली अपडेट
सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ मिळाली, मग आता झेडपी निवडणूक किती टप्प्यात होणार? समोर आली अपडेट
मुंबई:  गेल्या अनेक दिवसांपासून लांबणीवर पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबत सुप्रीम कोर्टाने राज्य निवडणूक आयोगाला सोमवारी मोठा दिलासा दिला. निवडणुकांचे आयोजन आणि तयारी करण्यासाठी न्यायालयाने आयोगाला वाढीव १५ दिवसांची मुदत दिली. राज्य निवडणूक आयोगाने सुप्रीम कोर्टाला मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. सुप्रीम कोर्टाने ही विनंती मान्य केली. याआधी सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका ३१ जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते. सुप्रीम कोर्टाने मुदतवाढ दिल्यानंतर किती टप्प्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका पार पडणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

किती टप्प्यांत होणार निवडणूक?

राज्यातील जादा आरक्षणासंदर्भातील प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या जिल्हा परिषदांव्यतिरिक्त, ५० टक्क्यांपेक्षा कमी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात घेण्यात येणार आहेत. या टप्प्यात राज्यातील १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समित्यांची निवडणूक होणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली.
advertisement
ज्या जिल्हा परिषदांमध्ये जादा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे, त्या वगळून उर्वरित जिल्ह्यांमध्ये निवडणूक प्रक्रिया राबवली जाईल. उर्वरित जिल्हा परिषदांच्या निवडणुका सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम आदेशानंतरच घेण्यात येतील, असेही वाघमारे यांनी स्पष्ट केले.
पहिल्या टप्प्यात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग (कोकण विभाग), पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर (पुणे विभाग) तसेच छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव आणि लातूर (छत्रपती संभाजीनगर विभाग) या १२ जिल्हा परिषदांचा समावेश आहे.
advertisement

कधीपर्यंत होणार निवडणूक?

याचबरोबर रायगडमधील १५, रत्नागिरी ९, सिंधुदुर्ग ८, पुणे १३, सातारा ११, सांगली १०, सोलापूर ११, कोल्हापूर ११, छत्रपती संभाजीनगर ९, परभणी ९, धाराशिव ८ आणि लातूरमधील १० अशा एकूण १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकाही जिल्हा परिषदांसोबतच १० फेब्रुवारीपूर्वी घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ZP Election: सुप्रीम कोर्टाकडून मुदतवाढ मिळाली, मग आता झेडपी निवडणूक किती टप्प्यात होणार? समोर आली अपडेट
Next Article
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला? या वर्षी पाकिस्तानच्या मागे
जगातील सर्वात आनंदी देश फिनलंड, सर्वात दुःखी कोण? भारताचा आनंद नेमका कुठे अडकला?
  • आर्थिक संकटात असलेला पाकिस्तान भारतापेक्षा जास्त आनंदी?

  • 'वर्ल्ड हॅप्पीनेस रिपोर्ट' वाचून चक्रावून जाल

  • सर्वात आनंदी देश फिनलंड, तर सर्वात दुःखी अफगाणिस्तान

View All
advertisement