वडिलांची कल्पना, मुलाची कमाल! सर्वजण करतायेत कौतुक, शेतकरी कुटुंबाची गोष्ट नक्की वाचा..

Last Updated:

युवा शेतकरी अंकित कुमारने लोकल18 शी बोलताना सांगितले की, बालपणापासूनच त्यांना शेतीत काहीतरी वेगळे करण्याची आवड आहे. त्यांचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून, ते अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत. त

शेतकऱ्याची कमाल
शेतकऱ्याची कमाल
विक्रम कुमार झा, प्रतिनिधी
पूर्णिया : शेतात सध्या वेगवेगळ्या प्रकारचे प्रयोग केले जात आहे. तसेच हे प्रयोग यशस्वीही होत आहेत. असाच एक प्रयोग एका शेतकऱ्याने केला आहे. सर्वजणांना हा प्रकार एक अनोखा प्रयोग वाटल्याने सर्वजण या शेतकऱ्याचे कौतुकही करत आहेत.
अंकित कुमार असे या तरुण शेतकऱ्याचे नाव आहे. तो बिहारच्या पूर्णिया परिसरातील सिंघिया बनेली येथील रहिवासी आहे. ते आपल्या शेतामध्ये तब्बल 25 प्रकारच्या विविध पिकांची शेती करत आहेत. यामुळे त्यांची वर्षाला चांगली कमाई होत आहे. अंकित कुमार हे शिक्षणासोबतच आपल्या वडिलांसोबत शेती करत आहेत. ते उत्तरप्रदेशातून बीएससी येथून अ‍ॅग्रीकल्चरचे शिक्षण करत आहेत.
advertisement
अंकित कुमार यांनी सांगितले की, शेतात तुम्ही अनेक प्रकारची पिके घेऊ शकतात. बीएससीचे शिक्षण घेत असताना कॉलेजमध्ये जे काही कृषीचा अभ्यास ते करत आहेत, ते आपल्या घरीच प्रॅक्टिकल करत आहेत. शेतात मिश्रित शेती करुन चांगल्या पद्धतीने उत्पादनही करता येत आहे. एका एकरात त्यांनी 25 प्रकारचा भाजीपाला लावला असून ही सर्व हंगामी पिके असल्याचे ते म्हणाले.
advertisement
25 प्रकारचा भाजीपाला -
अंकित कुमार यांनी सांगितले की, 25 प्रकारच्या पिकांमध्ये कांदा, लसूण, लाल शिमला मिरची, बीट, गाजर, ब्रोकोली, पडवळ, पत्ताकोबी, फूलकोबी, कोथिंबीर, टोमॅटो यासह विविध प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड आम्ही केली आहे. आम्ही आमच्या या उत्पादनांची विक्री करण्यासाठी बाजारात खूप कमी जातो. याआधी आम्ही आमच्या शेतात 36 प्रकारच्या वेगवेगळ्या पिकांची लागवड केली होती. याला कृषी प्रदर्शनीमध्ये दाखवण्यात आले होते आणि त्यांना सन्मानितही करण्यात आले होते.
advertisement
युवा शेतकरी अंकित कुमारने लोकल18 शी बोलताना सांगितले की, बालपणापासूनच त्यांना शेतीत काहीतरी वेगळे करण्याची आवड आहे. त्यांचे वडील अल्पभूधारक शेतकरी असून, ते अनेक वर्षांपासून पारंपरिक पद्धतीने शेती करत आहेत. तर आता अंकित कुमार हे शेतीचा अभ्यास करतो. ही कल्पना त्यांच्या वडीलांची होती. त्यांचे वडील जलालगढ येथील एका विज्ञान केंद्रात गेले असता तेथील शास्त्रज्ञांनी त्यांना ही सल्ला दिला होता.
advertisement
क्या बात हैं! मिस्तरीला मिळाली 1 लाख 37 हजार पगाराची ऑफर, काय प्रतिकिया दिली वाचा...
25 प्रकारचा भाजीपाला लावण्यासाठी 25 एकर जमिनीची आवश्यकता नसते. ते थोड्याशा जमिनीवरही 25 प्रकारच्या भाजीपाल्याची लागवड करू शकतात आणि चांगला पैसा कमवू शकतात. अंकित कुमार हे 25 प्रकारच्या भाजीपाल्याच्या लागवडीच्या माध्यमातून वर्षाला 5 लाख रुपयांची कमाई करत असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या या कल्पनेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
मराठी बातम्या/कृषी/
वडिलांची कल्पना, मुलाची कमाल! सर्वजण करतायेत कौतुक, शेतकरी कुटुंबाची गोष्ट नक्की वाचा..
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement