या कोंबडीसमोर कडकनाथही फेल, तब्बल 100 रुपयांना विकलं जातं फक्त 1 अंड, करू शकता बक्कळ कमाई
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
विशेष म्हणजे या जातीच्या कोंबडीची किंमत कडकनाथपेक्षा जास्त आहे. या कोंबड्या एका वर्षात फक्त 60 ते 70 अंडी घालतात. पण त्यांच्या अंड्याची किंमत सामान्य कोंबडीच्या अंड्यांपेक्षा खूप जास्त आहे.
सिमरनजित सिंह, प्रतिनिधी
शाहजहांपुर : भारतात शेतकरी शेतीसोबतच कुक्कुटपालनही करतात. यामुळे शेतकऱ्याला आर्थिक फायदाही होतो. देशातील अनेक राज्यात कुक्कुटपालनाला चालना देण्यासाठी सरकार शेतकऱ्यांना अनुदानही देते. भारतातील लोकांना चिकन आणि अंडी खायला आवडतात. त्यामुळे कुक्कुटपालन व्यवसाय झपाट्याने भरभराटीला येत आहे.
मुख्य पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज कुमार अग्रवाल यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, कुक्कुटपालनामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढते. शेतीसोबतच शेतकरी कुक्कुटपालन व्यवसाय करू शकतात. कुक्कुटपालनासाठी जास्त खर्च करण्याची गरज नाही.
advertisement
विशेष म्हणजे शेतकऱ्यांनी विशिष्ट जातीच्या कोंबड्या पाळल्या तर 5 ते 10 कोंबड्यांपासून ते वर्षभरात लाखो रुपयांची कमाई करू शकतात. असील कोंबडी ही मुख्यतः तामिळनाडू, आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि ओडिशामध्ये पाळली जाते. येथून अनेक देशांमध्ये निर्यातही झाली आहे.
advertisement
एका अंड्याची किंमत 100 रुपये -
डॉ. मनोज कुमार अग्रवाल यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना जर कोंबडी पाळायची असेल तर त्यांनी अशा जातीची कोंबडी निवडावी जिच्या अंड्याला बाजारात चांगला भाव मिळतो. यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी असील कोंबडा किंवा कोंबड्या पाळाव्यात.
विशेष म्हणजे या जातीच्या कोंबडीची किंमत कडकनाथपेक्षा जास्त आहे. असील कोंबड्या एका वर्षात फक्त 60 ते 70 अंडी घालतात. पण त्यांच्या अंड्याची किंमत सामान्य कोंबडीच्या अंड्यांपेक्षा खूप जास्त आहे. बाजारात असील कोंबडीच्या एका अंड्याची किंमत 100 रुपयांपर्यंत आहे. अशा परिस्थितीत केवळ एका कोंबडीतून वर्षभरात 60 ते 70 हजार रुपये कमावता येतात.
advertisement
भारतीय शास्त्रज्ञांची कमाल, कोंबड्यांवर प्रयोग शेतकऱ्यांच्या फायद्याचा, एका वर्षात देतात इतकी अंडी
डॉ. मनोज कुमार अग्रवाल हे पुढे म्हणाले की, असील कोंबडी सामान्य देशी कोंबड्यांसारखी नसते. तिचे तोंड लांब असते. ती दिसायलाही लांब दिसते. तिचे वजन खूपच कमी आहे. या जातीच्या 4 ते 5 कोंबड्यांचे वजन फक्त 4 किलो असते, असे सांगितले जाते. या जातीची कोंबडी देखील लढाईत वापरली जाते. शेतकऱ्यांनी असिल जातीची कोंबडी पाळली तर अंडी विकून श्रीमंत होऊ शकतात, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
Location :
Uttar Pradesh
First Published :
June 10, 2024 2:27 PM IST
मराठी बातम्या/मनी/कृषी/
या कोंबडीसमोर कडकनाथही फेल, तब्बल 100 रुपयांना विकलं जातं फक्त 1 अंड, करू शकता बक्कळ कमाई