भारतीय शास्त्रज्ञांची कमाल, कोंबड्यांवर प्रयोग शेतकऱ्यांच्या फायद्याचा, एका वर्षात देतात इतकी अंडी
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
शेतकरी आपले उत्पन्न वाढवण्यासाठी शेतीसोबत कुक्कुटपालनही करतात. कारण, देशात सतत वाढत असलेल्या अंडी आणि मांसाच्या वापरामुळे कुक्कुटपालन आता शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. त्यामुळेच कुक्कुटपालन अधिक फायदेशीर बनवण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञ कोंबडीच्या नवीन जाती विकसित करत आहेत. (सिमरनजीत सिंग, प्रतिनिधी)
कृषी विज्ञान केंद्र, नियामतपूर येथे सेवेत असलेले पशुसंवर्धन विभागाचे तज्ज्ञ डॉ. शिवकुमार यादव म्हणाले की, केंद्रीय पक्षी संशोधन संस्था (इज्जत नगर), बरेली यांच्या वतीने कॅरी निर्भीक, कॅरी श्यामा, उपकारी आणि हितकारी नावाची देशी कोंबडी तयार केली आहे. या कोंबड्या एका वर्षात 200 पेक्षा जास्त अंडी घालतात, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.
advertisement
भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेली देशी जाताची हितकारी कोंबडी हिच्या मानेवर केस नाहीत. ही कोंबडी शरीरातील उष्णता काढून टाकते. त्यामुळे बाजारात या कोंबडीच्या मांसाला खूप मागणी आहे. कोंबडीची ही देशी जात एका वर्षात 195 ते 200 अंडी घालते. साधारणपणे उन्हाळ्यात कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढते. मात्र, रोग प्रतिकारशक्ती मजबूत असल्याने उन्हाळ्यातही या अंड्यांचे बंपर उत्पादन मिळते.