अभ्यास केला अन् निर्णय घेतला, शेतकऱ्यानं लावलं गोल्डन सीताफळ, आता बक्कळ कमाई
- Published by:News18 Marathi
- Reported by:Patel Irfan Hassan
Last Updated:
सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सोमनाथ जोकारे यांनी आपल्या शेतात असाच प्रयोग केला. सीताफळ लागवडीतून ते लाखोंची कमाई करत आहेत.
इरफान पटेल, प्रतिनिधी
सोलापूर : एखादा हंगाम वाया गेला की पुरेशा उत्पन्नाअभावी शेतकरी कर्जबाजारी झाल्याचं चित्र आहे. मात्र, अशा बिकट परिस्थितीवर मात करत काही शेतकरी आपल्या शेतात नवीन प्रयोग करताना दिसतात. सोलापूर जिल्ह्यातील अनेक शेतकरी अभ्यास, संशोधन, तज्ज्ञांचा सल्ला आणि प्रयोगशीलतेमुळे फळबागांच्या शेतीतून चांगले उत्पादन घेत आहेत. दक्षिण सोलापूर तालुक्यातील कंदलगावचे शेतकरी सोमनाथ जोकारे यांनी आपल्या शेतात असाच प्रयोग केला. सीताफळ लागवडीतून ते लाखोंची कमाई करत आहेत.
advertisement
महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यासह बीड, जळगाव, अहमदनगर, नाशिक, सातारा आणि भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर सीताफळाचं उत्पादन होतं. सोमनाथ जोकारे यांनी 2020 मध्ये सीताफळच्या बागेची लागवड केली आहे. लागवडीसाठी NMK 1 गोल्डन या जातीची निवड केली. या जातीचं फळ दिसायला सुंदर असतं. तसेच ते कमी पाण्यावर देखील येऊ शकतं आणि जास्त काळ टिकतं. एका सीताफळाचं वजन 500 ते 600 ग्रॅम असतं, असं जोकारे यांनी सांगितलं.
advertisement
कशी केली लागवड?
कमी पाण्यावर येणारं सीताफळ म्हणून NMK 1गोल्डन जातीच्या सीताफळांची लागवडीसाठी निवड केली. एका रोपाची किंमत 60 रुपये असून 365 रोपे एका एकरात लावण्यात आली. 8 बाय 14 अशा पद्धतीनं लागवड केली. या जातीच्या वानाला कोणताही रोग येत नाही. जेव्हा झाडावरती फळ धारणा होते, तेव्हा बुरशी नाक्षक औषधाची फवारणी केली. तसेच शेळ्या, मेंढ्या कोणताही जनावर या झाडाला खात नाही. तसेच तीन वर्ष कांदा, भुईमूग अशा प्रकारे अंतरपिक सुध्दा घेण्यात आले.
advertisement
2 लाखांची कमाई
view commentsसोलापुरातील कृषी उत्पन्न बाजार समिती येथे हा सीताफळ विक्री केला जातो. मागील वर्षी 60 ते 50 रुपये प्रति किलो या दराने सोमनाथ जोकारे यांनी सिताफळ विक्री केली. यातून त्यांना पहिल्याच वर्षी 2 लाखांचं उत्पन्न मिळालं. यंदाही सीताफळ शेतीतून त्याहून अधिकचं उत्पन्न मिळण्याची आशा आहे. सीताफळातून मिळणारं उत्पन्न बघता ही शेती अधिक फायदेशीर ठरते, असं सोमनाथ जोकारे यांनी सांगितलं
Location :
Solapur,Maharashtra
First Published :
August 09, 2024 9:38 AM IST

