पेन्शनधारकांना मोदी सरकारचं मोठं गिफ्ट, RBI ने नियमात केले बदल, होणार मोठा फायदा
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
पेंशन वेळेवर न मिळाली तर बँकेची खैर नाही, सरकारी पेंशनधारकांसाठी गोड बातमी: RBI चा नवा नियम फायद्याचा ठरणार!
मुंबई : जर तुम्हाला केंद्र सरकार किंवा राज्य सरकारकडून पेंशन मिळते, किंवा तुमच्या कुटुंबात एखादा पेंशनधारक असेल, तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने नुकतेच एक नवीन नियम जाहीर केला आहे. या नव्या नियमांनुसार, जर निवृत्त सरकारी कर्मचाऱ्यांना पेंशन किंवा त्याचा थकीत रक्कम वेळेवर मिळत नसेल, तर संबंधित बँकेला वार्षिक 8% दराने व्याज भरावे लागणार आहे.
बँकांना नवा नियम लागू
RBI ने सरकारी पेंशन वितरित करणाऱ्या बँकांसाठी हा नवा नियम लागू केला आहे. यामागील उद्देश असा आहे की पेंशन किंवा त्याचा थकीत रक्कम वेळेवर मिळाला नाही, तर पेंशनधारकांचे नुकसान भरून निघावे. अनेक पेंशनधारकांकडून वेळोवेळी वाढीव पेंशन व बकायाबाबत तक्रारी करण्यात आल्या होत्या.
उशीर झाल्यास 8% व्याज भरावे लागेल
नवीन नियमानुसार, जर बँकेने पेंशन देण्यास विलंब केला, तर त्यांना पेंशनधारकाला 8% वार्षिक दराने व्याज भरावे लागेल. यामध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे की, ठरलेल्या तारखेच्या पुढे पेंशन किंवा बकाया रक्कम दिल्यास, त्या विलंबासाठी संबंधित बँकेने 8% दराने व्याज द्यावे लागेल. हे व्याज थेट पेंशनधारकाच्या खात्यात जमा करणे बंधनकारक असेल.
advertisement
पेंशन आणि व्याज एकाच दिवशी जमा करणे अनिवार्य
RBI ने स्पष्ट केले आहे की, वाढीव पेंशन किंवा बकायाची रक्कम खात्यात जमा करताना त्याच दिवशी संबंधित व्याज देखील जमा करणे आवश्यक आहे. हा नियम 1 ऑक्टोबर 2008 नंतर झालेल्या सर्व विलंबित पेंशन प्रकरणांवर लागू असेल. यासाठी पेंशनधारकाला स्वतंत्रपणे कोणतीही मागणी करावी लागणार नाही.
advertisement
बँकांनी सहानुभूतीपूर्वक वागावे
RBI ने बँकांना निर्देश दिले आहेत की, पेंशनधारकांना विशेषतः वयोवृद्ध पेंशनधारकांना मदत करावी आणि त्यांच्याशी सहानुभूतीने वागावे. बँकेच्या शाखांनी खात्री करावी की, पेंशन संबंधित कोणतीही देरी होणार नाही आणि त्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे वेळेत मिळवण्याची कार्यप्रणाली विकसित करावी. RBI चे स्पष्ट मत आहे की, बँकांनी RBI कडून आदेशांची वाट न पाहता स्वतःहून पेंशनचे पेमेंट वेळेवर पूर्ण करावे, जेणेकरून पुढील महिन्याच्या पेंशनमध्ये सर्व लाभ मिळू शकतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 09, 2025 8:32 AM IST