Budget 2025 Income Tax: होम लोनवर मिळणार 500000 रुपयांपर्यंत सूट?
- Published by:Kranti Kanetkar
- trending desk
Last Updated:
Budget 2025 Income Tax: कलम 80 सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतची सूट मिळते. त्यात होम लोनच्या मुद्दलासहित अन्य गुंतवणुकीचा समावेश असतो.
Budget 2025: एक फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. सध्या होम लोनच्या व्याजावर जास्तीत जास्त दोन लाख रुपयांपर्यंतची सूट मिळते. रिअल इस्टेट सेक्टरने ही मर्यादा वाढवून पाच लाख रुपये करण्याची मागणी केली आहे. त्यामुळे घर खरेदीदारांना अधिक दिलासा मिळू शकेल. कलम 80 सी अंतर्गत दीड लाख रुपयांपर्यंतची सूट मिळते. त्यात होम लोनच्या मुद्दलासहित अन्य गुंतवणुकीचा समावेश असतो. ही मर्यादा वाढवून पाच लाख रुपये करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे करदात्यांना अधिक लाभ मिळू शकेल. याविषयी अधिक जाणून घेऊ या.
Income Tax वाचवण्याची भन्नाट ट्रिक, गुंतवणूक करण्यासाठी बेस्ट पर्याय कोणते? आत्ताच पाहून घ्या
परवडणाऱ्या घरांच्या व्याख्येत बदलाची तयारी?
मेट्रो शहरांमध्ये घरांच्या किमती वाढत आहेत. हे लक्षात घेऊन परवडणाऱ्या घरांच्या व्याख्येत बदल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे अधिकाधिक नागरिक या योजनेचा लाभ घेऊ शकतील. त्याशिवाय, रियल इस्टेट सेक्टरने स्टँप ड्युटी तार्किक करण्याची आणि त्यात कपातीची मागणी केली आहे. त्यामुळे घर खरेदी करणाऱ्यांवरचा बोजा कमी होऊ शकेल.
advertisement
या मागण्या करण्यात आल्या असल्या, तरी त्याबद्दल अंतिम निर्णय काय होतो, हे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केल्यावरच कळेल.
सध्या होम लोनवर मिळणाऱ्या करसवलतीच्या नियमांबद्दल जाणून घेऊ या.
होम लोनवर इन्कम टॅक्स सूट मिळत असल्याने भारतात घर खरेदी करणाऱ्यांना आर्थिक मदत मिळते. सरकारने आयकर कायद्यातल्या वेगवेगळ्या कलमांतर्गत होम लोनवर सूट देण्याची व्यवस्था केली आहे. त्याविषयी जाणून घेऊ या.
advertisement
कलम 80 सी : मुद्दल परताव्यावर डिडक्शन - होम लोनच्या मुद्दल परताव्यावर दीड लाख रुपयांपर्यंतच्या सवलतीचा दावा करता येतो. घर बांधून पूर्ण झाल्यानंतरच ही सवलत मिळू शकते. पाच वर्षांच्या आत घराची विक्री केल्यास ही सूट रद्द होते आणि आधी घेतलेली सूट आपल्या उत्पन्नात जोडून त्यावर कर आकारला जातो.
कलम 24 (बी) : व्याजावर सवलत - होम लोनवर दिलेल्या व्याजावर दर वर्षी दोन लाख रुपयांपर्यंतच्या सवलतीचा लाभ घेता येतो. ही सूट सेल्फ ऑक्युपाइ़ड प्रॉपर्टीसाठी आहे. घर भाडेतत्त्वावर अन्य कोणाला राहण्यासाठी दिलं असेल, तर व्याजावर वरची मर्यादा नाही. संपूर्ण व्याजाचा दावा केला जाऊ शकतो. त्याची निर्मिती पाच वर्षांच्या आत पूर्ण झाली पाहिजे. उशीर झाल्यास सवलतीची मर्यादा 30 हजार रुपयांपर्यंतच राहते.
advertisement
कलम 80 ईई : पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांसाठी सूट - ही अतिरिक्त सवलत प्रति वर्ष 50 हजार रुपयांपर्यंत आहे. ही सवलत केवळ पहिल्यांदा घर खरेदी करणाऱ्यांनाच दिली जाते. त्यासाठी कर्जाची रक्कम 35 लाख रुपयांपेक्षा अधिक असता कामा नये, तसंच संपत्तीची किंमत 50 लाख रुपयांपेक्षा अधिक असता कामा नये. एक एप्रिल 2016 ते 31 मार्च 2017 या कालावधीत कर्ज घेतलेल्यांनाच ही सवलत उपलब्ध आहे.
advertisement
कलम 80 ईईए : परवडणारं घर खरेदी करणाऱ्यांना अतिरिक्त सूट - व्याजावर दीड लाख रुपयांपर्यंतची अतिरिक्त सूट आहे. त्यासाठी घराची स्टॅम्प ड्युटी व्हॅल्यू 45 लाख रुपयांपेक्षा अधिक असता कामा नये. एक एप्रिल 2019 ते 31 मार्च 2023 या कालावधीतच लोन घेतलेलं असलं पाहिजे. ही सूटदेखील पहिल्यांदाच घर खरेदी करणाऱ्यांसाठी आहे. कलम 24 (बी) अंतर्गत घेतलेल्या दोन लाख रुपयांच्या अतिरिक्त ही सूट मिळते.
advertisement
स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्कात सूट : कलम 80 सीअंतर्गत घराच्या खरेदीवेळी देण्यात आलेली स्टॅम्प ड्युटी आणि नोंदणी शुल्कावर सवलतीचा दावा करता येतो. ही सूट दीड लाख रुपयांच्या मर्यादेच्या आत उपलब्ध आहे.
संयुक्त होम लोन : समजा होम लोन संयुक्तरीत्या घेण्यात आलं असेल, (उदा. पती-पत्नी) तर दोन्ही व्यक्ती कलम 80 सी आणि कलम 24 (बी) अंतर्गत सवलतीचा दावा स्वतंत्रपणे करू शकतात. ते दोघंही त्या संपत्तीचे सह-मालक असावेत. तसं झालं, तर एकूण करसवलत दुप्पट होऊ शकते.
advertisement
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
January 15, 2025 1:41 PM IST