Income Tax Slab ची मर्यादा समजली नाही? मनातील सर्व गोंधळ एक मिनिटांत दूर करेल हा चार्ट

Last Updated:

निर्मला सीतारमण यांनी मध्यमवर्गाला दिलासा देत 12 लाख रुपयांपर्यंत कोणताही कर नसल्याचे बजेटमध्ये जाहीर केले. ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक व्याजावर कर सवलत 1 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे.

News18
News18
मुंबई: भारताची अर्थव्यवस्था सर्वात वेगाने वाढणारी आहे. त्याच बरोबर भारतीय अर्थव्यवस्थेचा सर्वात महत्त्वाचा घटक हा मध्यमवर्ग आहे. त्यामुळे याच मध्यमवर्गाला निर्मला सीतारमण यांनी मोठा दिलासा इनकम टॅक्समधून दिला आहे. इनकम टॅक्समध्ये बदल करण्यात आले आहेत. 12 लाख रुपयांपर्यंत कोणताही कर लागणार नाही असं अर्थमंत्री सीतारमण यांनी बजेटमध्ये म्हटलं आहे.
आता नव्या घोषणेनंतर 12 लाख उत्पन्न असणाऱ्यांचे दरवर्षी 80 हजार रुपये वाचणार आहेत. 25 लाख रुपयांचे उत्पन्न असणाऱ्यांना पूर्वीच्या तुलनेत १० हजारांचा फायदा होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देताना बँक व्याजावर कर सवलतीची मर्यादा 50,000 रुपयांवरून 1 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. यामुळे निवृत्त नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
12 लाख उत्पन्न असणाऱ्यांची 80 हजार रुपये बचत होणार आहे. 16 लाख उत्पन्न असणाऱ्यांचे 50 हजार बचत होणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे सर्वसामान्य लोकांच्या हातात पगार राहणार आहे. त्यामुळे हा सर्वात मोठा दिलासा मानला जात आहे.
advertisement
कर स्लॅबमध्ये बदल
0 ते 4 लाख शून्य
4 ते 8 लाख 5%
8 -12 लाख 10%
12 ते 16 लाख 15%
16 ते 20 लाख 20%
20 ते 24 लाख 25%
24 लाख रुपयांपेक्षा जास्त 30%
advertisement
गेल्या काही वर्षांमध्ये आयकर सवलत मर्यादा
2005: Rs 1 लाख
2012: Rs 2 लाख
2014: Rs 2.5 लाख
2019: Rs 5 लाख
2023: Rs 7 लाख
2025: Rs 12 लाख
view comments
मराठी बातम्या/मनी/
Income Tax Slab ची मर्यादा समजली नाही? मनातील सर्व गोंधळ एक मिनिटांत दूर करेल हा चार्ट
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement