Income Tax: महिन्याला 1 लाख कमवले तरीही Income Tax देऊ नका! जाणून घ्या नवीन टॅक्सबद्दल सर्व अपडेट

Last Updated:

Income Tax Slab Budget 2025: टॅक्स पेअर्सवर जास्तीचा भार पडत असल्याने अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमधून ही घोषणा केली आहे.

News18
News18
मुंबई: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सर्वसामान्य लोकांना मोठा दिलासा दिला आहे. पीएम मोदी यांचा मास्टर स्ट्रोक दिला आहे. या बजेटमधून इनकन टॅक्सबाबत मोठी घोषणा केली आहे. 12 लाख रुपयांपर्यंत सर्वसामान्य कोणताही कर द्यावा लागणार नाही. नव्या टॅक्स रिजीममधून जे लोक टॅक्स भरणार आहेत त्यांनाच फक्त ही सूट मिळणार आहे. जुन्या टॅक्सवर मात्र ही सूट मिळणार नाही.
नव्या टॅक्स रिजीममधून अर्ज करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 12 लाखपर्यंत कोणताही कर आकारला जाणार नाही. त्यामुळे आता नव्या टॅक्स रिजीममधून अर्ज करणाऱ्यांना दिलासा मिळाला आहे. टॅक्स पेअर्सवर जास्तीचा भार पडत असल्याने अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमधून ही घोषणा केली आहे.
आता तुम्ही 1 लाख रुपये महिन्याला कमवले तरी तुमच्या पगारातून टॅक्स कापला जाणार नाही. त्यामुळे आता 1 लाख रुपयांपर्यंत पगार असणाऱ्या सगळ्या नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
या घोषणेनंतर शेअर मार्केटमध्ये पुन्हा अस्थिरता निर्माण झाली आहे. एफएमसीजी स्टॉक्स वधारले आहेत. हे बजेट गेमचेंजिंग बजेट असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. त्यामुळे येत्या काळात अनेक बदल बघायला मिळतील. एफएमजी स्टॉक चांगले नंबर्स देतील असा विश्वास व्यक्त केला आहे. इतकंच नाही तर जुन्यामधून सगळ्यांना नवीन टॅक्समध्ये शिफ्ट करण्यासाठी ही योजना केली जात आहे असंही काही तज्ज्ञांनी म्हटलं आहे.
advertisement
कर स्लॅबमध्ये बदल
0 ते 4 लाख शून्य
4 ते 8 लाख 5%
8 -12 लाख 10%
12 ते 16 लाख 15%
16 ते 20 लाख 20%
20 ते 24 लाख 25%
24 लाख रुपयांपेक्षा जास्त 30%
गेल्या काही वर्षांमध्ये आयकर सवलत मर्यादा
2005: Rs 1 लाख
2012: Rs 2 लाख
2014: Rs 2.5 लाख
advertisement
2019: Rs 5 लाख
2023: Rs 7 लाख
2025: Rs 12 लाख
view comments
मराठी बातम्या/मनी/
Income Tax: महिन्याला 1 लाख कमवले तरीही Income Tax देऊ नका! जाणून घ्या नवीन टॅक्सबद्दल सर्व अपडेट
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement