मोठी बातमी! मोदी सरकारचे बजेटमधले असे 5 निर्णय जे आयुष्य बदलून टाकतील
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी बजेटमध्ये 12 लाखांपर्यंत उत्पन्नावर करमुक्ती, ज्येष्ठ नागरिकांना करसवलत, दोन घरांवर करसवलत, अपडेटेड कर परताव्यासाठी 4 वर्षे दिली.
मुंबई: अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत बजेट सादर केलं. या बजेटमध्ये त्यांनी सर्वसामान्य लोकांना डोळ्यासमोर ठेवून महत्त्वाच्या घोषणा केल्या. यामध्ये इनकम टॅक्स भरणाऱ्या मोठा दिलासा दिला आहे. 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर झालेल्या अर्थसंकल्पात वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी 5 मोठ्या घोषणा केल्या आहेत. याचा थेट परिणाम तरुणांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वसामान्य लोकांवर होणार आहे.
1. 12 लाख रुपयांपर्यंत उत्पन्नावर कर नाही
वित्तमंत्र्यांनी करदात्यांना मोठा दिलासा देत करमुक्त उत्पन्नाची मर्यादा 7 लाख रुपयांवरून 12 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. तसेच, सॅलरीड कर्मचार्यांसाठी 75,000 रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनसह एकूण कर सवलत 12.75 लाख रुपये झाली आहे.
2. ज्येष्ठ नागरिकांना मोठी करसवलत
ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देताना बँक व्याजावर कर सवलतीची मर्यादा 50,000 रुपयांवरून 1 लाख रुपयांपर्यंत वाढवली आहे. यामुळे निवृत्त नागरिकांना मोठा फायदा होणार आहे.
advertisement
3. दोन घरे असल्यासही करसवलत मिळणार
यापूर्वी फक्त एका स्वतःच्या वापरासाठी असलेल्या घरावर (Self Occupied House) करसवलत मिळत होती, पण आता दोन घरे असल्यास दोन्ही घरांवरही हा लाभ मिळेल.
4. अपडेटेड कर परतावा भरण्यास 4 वर्षे मिळणार
पूर्वी 2 वर्षांच्या आत कर परतावा (Updated Tax Return) सुधारून भरता येत होता, परंतु आता ही मुदत 4 वर्षांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
advertisement
5. जीवनावश्यक औषधांवरील कस्टम ड्युटी हटवली
सरकारने कॅन्सर आणि दुर्मिळ आजारांवरील 36 जीवनावश्यक औषधांवरील कस्टम ड्युटी हटवली आहे. त्यामुळे या औषधांच्या किमती कमी होतील आणि रुग्णांना मोठा दिलासा मिळेल.
या निर्णयांचा सर्वसामान्य लोकांवर कसा परिणाम होईल?
view commentsमध्यमवर्गीयांना कर कपातीचा मोठा फायदा होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांचे बँक व्याज उत्पन्न वाढणार आहे. दोन घरे असलेल्या नागरिकांना करसवलतीचा लाभ मिळणार. करदात्यांना अपडेटेड रिटर्नसाठी जास्त वेळ मिळणार, गंभीर आजारांवरील उपचार स्वस्त होणार
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
February 01, 2025 2:38 PM IST


