दिसू लागले बजेटचे परिणाम; स्वस्त झाले आयफोन; ॲपलने या मॉडेल्सच्या किमती केल्या कमी!
- Published by:Sayali Zarad
- trending desk
Last Updated:
तुम्हाला मोबाइल फोन आणि चार्जरच्या खरेदीवर पाच टक्के कमी पैसे द्यावे लागतील. या घोषणेनंतर अॅपलने आपल्या आयफोनच्या किमतीत मोठी कपात केली आहे. नेटवर्क 18 च्या मनीकंट्रोल वेबसाइटने अॅपलच्या ऑनलाइन स्टोअरवरच्या किमतींची खात्री केली आहे आणि किमती अधिकृतपणे कमी करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2024 बजेटमध्ये अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत. सरकारने मोबाइल फोन आणि चार्जरवरची कस्टम ड्युटी कमी केली आहे. सरकारने मोबाइल आणि चार्जरवरची कस्टम ड्युटी 20% वरून 15% पर्यंत कमी केली आहे. म्हणजेच आता तुम्हाला मोबाइल फोन आणि चार्जरच्या खरेदीवर पाच टक्के कमी पैसे द्यावे लागतील. या घोषणेनंतर अॅपलने आपल्या आयफोनच्या किमतीत मोठी कपात केली आहे. नेटवर्क 18 च्या मनीकंट्रोल वेबसाइटने अॅपलच्या ऑनलाइन स्टोअरवरच्या किमतींची खात्री केली आहे आणि किमती अधिकृतपणे कमी करण्यात आल्याची माहिती उघड झाली आहे.
आयफोन नवीन सीरिज लाँच झाल्यावर आधीच्या सीरिजच्या मॉडेल्सच्या किमती कमी करते; पण या वेळी मात्र उलटंच घडलं आहे. अॅपलने नवीन आयफोन मॉडेल लाँच करण्याच्या काही महिन्यांपूर्वी विविध मॉडेल्सच्या किमती कमी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. नवीन फोन सप्टेंबर 2024 मध्ये लाँच होण्याची शक्यता आहे.
advertisement
अॅपल आयफोन 15 प्रो हे मॉडेल 1,34,900 रुपये आणि आयफोन 15 प्रो मॅक्स हे मॉडेल 1,59,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किमतीत लाँच करण्यात आलं होतं; पण डिस्काउंटनंतर आता आयफोन 15 प्रो 1,29,800 रुपयांना मिळत आहे आणि आयफोन 15 प्रो मॅक्स 1,54,000 रुपयांना खरेदी करता येत आहे. आयफोन 15 Pro ची किंमत 5,100 रुपयांनी, तर आयफोन 15 प्रो मॅक्सची किंमत 5,900 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
advertisement
‘व्हॅनिला’ आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लस या मॉडेल्सच्या किमतीती थोड्या कमी करण्यात आल्या आहेत. आयफोन 15 आणि आयफोन 15 प्लसच्या किमती फक्त 300 रुपयांनी कमी झाल्या आहेत आणि आता हे फोन अनुक्रमे 79,600 आणि 89,600 रुपयांना मिळत आहेत.
अॅपल आयफोन 13 आणि अॅपल आयफोन 14 च्या किमतीत फक्त 300 रुपयांची किरकोळ कपात करण्यात आली आहे. परवडणाऱ्या आयफोन पैकी एक SE ची किंमत 2,300 रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
advertisement
याशिवाय आयफोन SE आता 47,600 रुपयांना घेता येऊ शकतो. पूर्वी त्याची किंमत 49,900 रुपये होती. अॅपल आयफोन 13 हा 59,600 रुपये आणि आयफोन 14 आता 69,600 रुपयांना विकला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 27, 2024 3:22 PM IST
मराठी बातम्या/मनी/
दिसू लागले बजेटचे परिणाम; स्वस्त झाले आयफोन; ॲपलने या मॉडेल्सच्या किमती केल्या कमी!