LPG Gas Cylinder: 1 जुलैपासून गॅस बिल कमी होणार! LPG सिलेंडरचे दर स्वस्त, मोजावे लागणार इतके पैसे
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
LPG Gas Cylinder: महागाई वाढत असताना दरवाढीच्या काळात दिलासा! LPG सिलेंडर ६० रुपयांनी स्वस्त, जाणून घ्या नवे रेट
LPG Gas Cylinder: सर्वसामान्यांच्या खिशावरचा भार मोदी सरकारने हलका केला आहे. 1 जुलै रोजी महागाईपासून थोडासा दिलासा सर्वसामान्य लोकांना मिळण्याची शक्यता आहे. सरकारने LPG सिलेंडरचे दर स्वस्त केले आहेत. 60 रुपयांपर्यंत दरात कपात केली आहे. त्यामुळे नवे दर कसे असतील, घरगुती आणि व्यावसायिक दर तुमच्याकडे कसे असणार आहेत ते जाणून घेऊया.
तेल विपणन कंपन्यांनी 19 किलो व्यावसायिक LPG सिलेंडरच्या दरात 60 रुपयांपर्यंत कपात केली आहे. नवीन दर आज, मंगळवार आजपासून लागू करण्यात आले आहेत. मात्र, 14 किलोच्या घरगुती एलपीजी सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आला नाही. ते दर मागच्या महिन्यानुसार कायम आहेत. त्यामुळे गृहिणींना कोणताही दिलासा मिळालेला नाही. छोटे व्यावसायिक आणि हॉटेल इंडस्ट्रिला मात्र मोठा दिलासा मिळाला आहे.
advertisement
व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या दरातील ही कपात व्यावसायिकांसाठी एक चांगली बातमी आहे. व्यावसायिक सिलेंडरच्या दरातील कपातीनंतर, देशाची राजधानी दिल्लीत आता याची किरकोळ किंमत 1665 रुपये झाली आहे. यापूर्वी तो 1723.50 रुपयांना मिळत होता. मुंबईत (Mumbai LPG Price) या सिलेंडरची किंमत 1674.50 रुपयांवरून 1616.50 रुपयांवर आली आहे, तर चेन्नईमध्ये 1881 रुपयांना मिळणारा सिलेंडर आता 1823.50 रुपयांना मिळणार आहे.
advertisement
विशेष म्हणजे, गेल्या महिन्यात म्हणजेच मे महिन्यातही व्यावसायिक सिलेंडरची किंमत कमी करण्यात आली होती. याआधीही व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या आणि 1 जून 2025 रोजी 24 रुपयांनी स्वस्त करण्यात आला होता. घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीमध्ये जून आणि जुलै दोन्ही महिन्यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे गृहिणींना दिलासा मिळणार नाही.
advertisement
सिलेंडरचे दर कमी झाल्याने हॉटेल, रेस्टॉरंट, ढाबा आणि इतर व्यावसायिक आस्थापनांना मोठा दिलासा मिळेल, जे मोठ्या प्रमाणात व्यावसायिक गॅस सिलेंडरचा वापर करतात. कमी झालेल्या किमतींमुळे या व्यवसायांचा परिचालन खर्च कमी होईल आणि ते आपल्या ग्राहकांना चांगल्या सेवा देऊ शकतील.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
July 01, 2025 6:51 AM IST
मराठी बातम्या/मनी/
LPG Gas Cylinder: 1 जुलैपासून गॅस बिल कमी होणार! LPG सिलेंडरचे दर स्वस्त, मोजावे लागणार इतके पैसे