ग्राहक प्रायव्हसी अधिकार! दुकानदार मागू शकत नाही नंबर, फक्त या 6 ठिकाणीच द्या
- Published by:Mohini Vaishnav
Last Updated:
आपल्या देशात ग्राहकांसाठी अनेक कायदे केलेले आहेत. यामध्ये ग्राहकांची अनेक अधिकार आहेत. यामधील प्रायव्हसी अधिकार एक आहे. याविषयीच सविस्तर आपण जाणून घेऊया.
मुंबई : अनेकदा आपण पाहतो की, दुकानदार बिल तयार करताना ग्राहकांना मोबाईल नंबर मागतात. अनेकांना वाटतं की हे महत्त्वाचं आहे आणि यामुळे ते मोबाईल नंबर देतात. मात्र सरकार आणि कायदा स्पष्ट सांगतो की, ही चुकीची पद्धत आहे. ग्राहकांना मोबाईल नंबर न देताही बिल घेण्याचा अधिकार आहे. स्वतःच्या प्रायव्हसीचे रक्षण करणं त्याचा अधिकार आहे.
दुकानदार मोबाईल नंबर का मागतात?
तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, एखाद्या दुकानातून साहित्य खरेदी केल्यानंतर कॅशियर किंवा सेल्समन तुमच्याकडून मोबाईल नंबर मागतो. तो म्हणतो की, ऑफर पाठवायचे आहेत किंवा प्रिंट करायचे आहेत. पण खरंतर दुकानदार किंवा मोठ्या कंपन्या या मोबाईल नंबर घेऊन डेटाबेस तयार करतात. नंतर याच नंबरवर मार्केटिंग मेसेज पाठवले जातात. डिस्काउंट किंवा ऑफर प्रमोट केल्या जातात. कॉल करुन प्रोडक्ट विकण्याचा प्रयत्न केला जातो.अनेकदा हा डेटा थर्ड पार्टी कंपन्यांना विकला जातो. म्हणूनच तुम्हाला अनोळखी नंबरवरुन मेसेज, व्हॉट्सअॅप मेसेज किंवा कॉल हे येत असतात.
advertisement
तुम्ही तुमचा नंबर देण्यास नकार दिला तरीही दुकानदाराला तुम्हाला बिल देणं अनिवार्य आहे. त्याने फोन नंबर मागितल्याशिवाय बिल दिलं नाही तर हे कायदेशीर उल्लंघन आहे. या विरोधात तुम्ही तक्रार करु शकता.
फक्त याच ठिकाणी देऊ शकता मोबाईल नंबर
advertisement
- गॅरंटी किंवा वॉरंटी रजिस्ट्रेशनसाठी
- प्रोडक्ट रिकॉल किंवा सर्व्हिस अपडेटसाठी
- ऑनलाइन कार्ड पेमेंट कन्फर्मेशनसाठी
- कस्टमर सपोर्ट किंवा रिपेयर सर्व्हिस अपडेटसाठी
- लॉयल्टी प्रोग्राम किंवा मेंबरशिप कार्डसाठी (ग्राहकांच्या इच्छेनुसार)
ग्राहक संरक्षण कायदा, 2019
याअंतर्गत, जर दुकानदाराने तुमच्या संमतीशिवाय तुम्हाला बिल देण्यास नकार दिला किंवा माहिती मागितली, तर ती एक अन्याय्य व्यापार पद्धत मानली जाईल.
advertisement
डिजिटल वैयक्तिक डेटा संरक्षण कायदा, 2023
view commentsया नवीन कायद्यात स्पष्टपणे म्हटले आहे की, तुमच्या संमतीशिवाय तुमचा डेटा थर्ड पार्टीला संग्रहित करणे, शेअर करणे किंवा विकणे बेकायदेशीर आहे. जर एखाद्या दुकानदाराने तुमच्या डेटाचा गैरवापर केला तर त्याला दंड आणि कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. तक्रार दाखल करून ग्राहकाला त्याच्या हक्कांचे रक्षण करण्याचा अधिकार देखील आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 05, 2025 5:49 PM IST


