Success Story : पान सेंटरने पालटलं तरुणाचं नशीब, महिन्याला अडीच लाख उलाढाल, सांगितला यशाचा फॉर्म्युला
- Published by:Mohan Najan
- Reported by:Ravi Shivaji Shikare
Last Updated:
नोकरदार वर्ग तसेच रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी पानाचा स्वाद घेण्यासाठी येतात. या पान सेंटरची जवळपास दररोज 300 पानांची विक्री होते.
छत्रपती संभाजीनगर : वाळूज येथील प्रताप चौक परिसरात धीरज टेकाळे या तरुणाने एक वर्षांपूर्वी 'जय भवानी' या नावाचे फॅमिली पान सेंटर सुरू केले आहे. या पान सेंटरवर चॉकलेट, ड्रायफ्रूट, पिस्ता, स्ट्रॉबेरी, मॅंगो यासह 20 प्रकारचे पान मिळतात. छत्रपती संभाजीनगर शहर, वाळूज, बजाजनगरसह जिल्हाभरातून तरुण-तरुणी, नोकरदार वर्ग तसेच रस्त्यावरून प्रवास करणारे प्रवासी पानाचा स्वाद घेण्यासाठी येतात. या पान सेंटरची जवळपास दररोज 300 पानांची विक्री होते.
पानाची साधारणपणे किंमत 20 रुपये ते 40 रुपयांपर्यंत आहे. विशेषतः या जय भवानी पान सेंटरवरील पान लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत परिवारातील सर्वजण निश्चिंतपणे हे पान चाखू शकतात. पान सेंटर व्यवसायाच्या माध्यमातून टेकाळे यांची महिन्याला 2 ते 2.50 लाख रुपयांची उलाढाल होते, तर निव्वळ नफा 80 ते 90 हजार रुपये मिळतो. मेहनत, नवीन कल्पना आणि दर्जेदार सेवा यामुळे कमी कालावधीत ग्राहकांचा विश्वास जिंकला असल्याचे टेकाळे यांनी लोकल 18 सोबत बोलताना सांगितले.
advertisement
नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या तरुणांना टेकाळे यांनी एक महत्त्वाचा सल्ला दिला आहे, पान सेंटर किंवा कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी बाजाराचा सखोल अभ्यास करा. पान कसे तयार केले जाते, कोणते प्रकार लोकप्रिय आहेत हे स्वतः शिका. व्यवसायासाठी योग्य ठिकाण निवडा, जिथे लोकांची वर्दळ आहे. सातत्याने चांगली सेवा दिल्यास यश नक्की मिळते.
view commentsLocation :
Aurangabad Cantonment,Aurangabad,Maharashtra
First Published :
October 09, 2025 9:33 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Success Story : पान सेंटरने पालटलं तरुणाचं नशीब, महिन्याला अडीच लाख उलाढाल, सांगितला यशाचा फॉर्म्युला