E20 Petrol चा गाडीच्या मायलेजवर परिणाम होतो का? याने इंजिन खराब होतं?
- Published by:Devika Shinde
Last Updated:
सरकारने E20 पेट्रोल म्हणजेच 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल देशभर उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पण यानंतर वाहनधारकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, ज्यांची उत्तरं ते सोशल मीडिया किंवा गुगलवरुन शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
मुंबई : सध्या भारतात पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याचं प्रमाण वाढवलं जात आहे. पर्यावरणाचं रक्षण, परकीय चलनाची बचत आणि शेतकऱ्यांना नवा बाजारपेठीय फायदा मिळवून देण्यासाठी सरकारने E20 पेट्रोल म्हणजेच 20% इथेनॉल मिश्रित पेट्रोल देशभर उपलब्ध करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पण यानंतर वाहनधारकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, ज्यांची उत्तरं ते सोशल मीडिया किंवा गुगलवरुन शोधण्याचा प्रयत्न करत आहे.
या सगळ्या एक कॉमन प्रश्न असा की हे नवीन इंधन वापरल्याने मायलेज कमी होतंय का? यामुळे गाडीचं इंजिन खराब होतंय का?
E20 पेट्रोल म्हणजे काय?
80% सामान्य पेट्रोल आणि 20% इथेनॉलचं मिश्रण आहे. इथेनॉल प्रामुख्याने ऊस आणि धान्यांपासून तयार केलं जातं. हे इंधन वापरल्याने कार्बन उत्सर्जन कमी होतं, तसेच परकीय तेलावर अवलंबित्वही घटतं.
advertisement
E20चा गाडीच्या मायलेजवर परिणाम होतो का?
तज्ज्ञांच्या मते, E20 पेट्रोल वापरल्याने मायलेजमध्ये 2% ते 6% पर्यंत घट होऊ शकते. कारण इथेनॉलची ऊर्जा क्षमता पेट्रोलपेक्षा कमी आहे, त्यामुळे गाडीला तेवढंच अंतर कापण्यासाठी थोडं जास्त इंधन लागतं. नवीन (2022 नंतरच्या) E20-रेडी गाड्यांमध्ये हा फरक तुलनेने कमी असतो.
E20ने इंजिन खराब होतं का?
सध्या तरी E20 मुळे मोठ्या प्रमाणात इंजिन खराब झाल्याच्या अधिकृत नोंदी नाहीत. मात्र, जुन्या आणि E20 रेडी नसलेल्या गाड्यांमध्ये काही समस्या जसे की गॅस्केट झिजणं, रबर आणि प्लास्टिक पार्ट्सवर परिणाम होणं, हार्ड स्टार्ट किंवा सुरुवातीला परफॉर्मन्स कमी होणं दिसू शकतं. त्यामुळे जुन्या वाहनधारकांनी सर्व्हिसिंग करूनच E20 वापरायला सुरुवात करणं योग्य ठरेल.
advertisement
एकंदरीत काय तर E20 पेट्रोलमुळे मायलेज थोडं कमी होऊ शकतं, पण नवीन गाड्यांसाठी ते सुरक्षित आहे. जुन्या वाहनधारकांनी मात्र योग्य सल्ला घेऊनच त्याचा वापर करावा.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 02, 2025 7:01 AM IST


