Fastag Annual Pass: महाराष्ट्रात किती ठिकाणी लागू होणार Fastag Annual Pass? तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
फास्ट टॅगचा वार्षिक पास 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. 3000 रुपये भरून हा पास घरबसल्या सक्रिय करता येईल. पास राष्ट्रीय महामार्ग आणि एक्सप्रेस वेवर लागू आहे.
नवी दिल्ली: फास्ट टॅगचा वार्षिक पास काढून तुम्ही फ्रीमध्ये फिरू शकता, यामुळे तुमचे 7000 रुपये वाचणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पास तुम्हाला घरबसल्या सक्रिय करता येणार आहे. 3000 रुपये भरुन तुम्ही हा पास काढू शकता. या पासची सुरुवात 15 ऑगस्टपासून होत आहे. 3000 रुपये भरुन हा पास लोक वापरू शकतात. हा पास राष्ट्रीय महामार्ग आणि राष्ट्रीय एक्सप्रेस वेवर सक्रिय असेल. हा पास तुम्हाला किती लागू होऊ शकतो? तो काढायचा कसा, महाराष्ट्रातील कोणत्या टोलनाक्यांवर तो चालणार या सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तर जाणून घेऊया.
FASTag वार्षिक पास म्हणजे काय?
FASTag वरील वार्षिक पासमुळे खाजगी कार, जीप आणि व्हॅनला एका वर्षासाठी किंवा 200 वेळा फ्री प्रवास करता येणार आहे. यामुळे तुमचे पैसे वाचतात आणि टोल प्लाझावरून प्रवास करण्याची सुविधा मिळते. ही योजना 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
वार्षिक पास कोठे खरेदी करता येईल?
हा पास फक्त 'राजमार्गयात्रा' मोबाईल ॲप्लिकेशन आणि NHAI च्या वेबसाइटवर सक्रिय करता येईल.
advertisement
वार्षिक पास कसा सक्रिय करायचा?
वाहन आणि त्याच्या FASTag ची पात्रता तपासल्यानंतर हा पास सक्रिय केला जाईल. पडताळणी यशस्वी झाल्यावर, 2025-26 या वर्षासाठी 3000 रुपयांचा तुम्ही पास 'राजमार्गयात्रा' ॲप किंवा NHAI वेबसाइटवरून अॅक्टिव्ह करू शकता. पेमेंटची खात्री झाल्यावर, नोंदणीकृत FASTag वर पास सक्रिय होईल.
आधीच FASTag असेल, तर मला नवीन खरेदी करण्याची गरज आहे का?
नाही, तुम्हाला नवीन FASTag खरेदी करण्याची गरज नाही. तुमचा सध्याचा FASTag योग्य निकष पूर्ण करत असल्यास (उदा. तो वाहनाच्या विंडशील्डवर योग्यरित्या लावलेला असावा, वैध वाहन नोंदणी क्रमांकाशी जोडलेला असावा, तो ब्लॅकलिस्टेड नसावा) त्यावर हा पास सक्रिय करता येईल.
advertisement
वार्षिक पास कोणत्या टोल प्लाझावर वापरता येतो?
हा पास फक्त राष्ट्रीय महामार्ग (NH) आणि राष्ट्रीय एक्सप्रेसवे (NE) वरील टोल प्लाझासाठीच आहे. राज्य सरकार किंवा स्थानिक संस्थांद्वारे व्यवस्थापित एक्सप्रेसवे, राज्य महामार्ग (SH) इत्यादींवरील टोल प्लाझावर FASTag सामान्य FASTag प्रमाणेच काम करेल आणि लागू असलेले शुल्क आकारले जाईल.
advertisement
वार्षिक पासची वैधता किती आहे?
हा पास सक्रिय केल्याच्या तारखेपासून एक वर्ष किंवा 200 फेऱ्यांपर्यंत मर्यादित आहे. यापैकी जे आधी पूर्ण होईल तोपर्यंत वैध असेल. 200 फेऱ्या पूर्ण झाल्या तर तुम्ही नवीन पुन्हा फास्टटॅग काढू शकता. त्याचे फायदे पुढे चालू ठेवण्यासाठी, तुम्हाला तो पुन्हा सक्रिय करावा लागेल.
वार्षिक पास सर्व प्रकारच्या वाहनांसाठी उपलब्ध आहे का?
नाही. हा पास फक्त खाजगी, गैर-व्यावसायिक कार, जीप आणि व्हॅनसाठी लागू आहे. व्यावसायिक वाहनांमध्ये त्याचा वापर केल्यास कोणत्याही सूचनेशिवाय तो त्वरित निष्क्रिय केला जाईल.
advertisement
वार्षिक पास दुसऱ्या वाहनावर ट्रान्सफर करता येतो का?
नाही. हा पास non-transferable नाही आणि तो फक्त ज्या वाहनावर FASTag लावला आहे आणि नोंदणीकृत आहे, त्याच वाहनासाठी वैध आहे. दुसऱ्या वाहनावर तो वापरल्यास निष्क्रिय केला जाईल.
वाहनाच्या विंडशील्डवर FASTag लावलेला असणे आवश्यक आहे का?
होय. वार्षिक पास केवळ नोंदणीकृत वाहनाच्या विंडशील्डवर योग्यरित्या लावलेल्या FASTag वरच सक्रिय केला जाईल.
advertisement
चेसिस नंबर वापरून नोंदणी केलेल्या FASTag वर मी वार्षिक पास मिळवू शकतो का?
नाही. चेसिस नंबरने नोंदणी केलेल्या FASTag वर वार्षिक पास जारी केला जाणार नाही. पास सक्रिय करण्यासाठी तुम्हाला तुमचा वाहन नोंदणी क्रमांक (VRN) अपडेट करावा लागेल.
वार्षिक पासमध्ये 200 फेऱ्या कशा मोजल्या जातील?
पॉइंट-आधारित टोल प्लाझासाठी: टोल प्लाझावरून प्रत्येक वेळी जाताना एक क्रॉसिंग मोजले जाईल. ये-जा (round crossing) केल्यास दोन क्रॉसिंग मोजले जातील. क्लोज्ड टोलिंग टोल प्लाझासाठी: एकदा प्रवेश करून बाहेर पडल्यास एक क्रॉसिंग मोजले जाईल.
advertisement
महाराष्ट्रात किती टोलनाके आणि कुठे चालणार पास?
महाराष्ट्रात एकूण 87 टोलनाके आहेत. मात्र राज्याच्या अंतर्गत येणाऱ्या महामार्गावर हा पास चालणार नाही. मुंबई-पुणे एक्सप्रेस वे, समृद्धी महामार्ग, अटल सेतूवरही हा पास चालणार नाही.
मला वार्षिक पासशी संबंधित SMS सूचना मिळतील का?
होय. वार्षिक पास सक्रिय करून तुम्ही, एसएमएस अलर्ट आणि इतर सूचना पाठवण्यासाठी, 'राजमार्गयात्रा'ला तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरचा वापर करण्याची परवानगी देत आहात.
वार्षिक पास अनिवार्य आहे का?
नाही, वार्षिक पास अनिवार्य नाही. सध्याची FASTag प्रणाली पूर्वीप्रमाणेच चालू राहील. जे ग्राहक वार्षिक पासची निवड करणार नाहीत, ते लागू असलेल्या दरांनुसार नेहमीप्रमाणे FASTag वापरू शकतात.
वार्षिक पास खरेदी करण्यासाठी FASTag वॉलेटमधील पैशांचा वापर करू शकतो का?
नाही. वार्षिक पासचे ३,००० शुल्क तुम्हाला 'राजमार्गयात्रा' ॲपमध्ये उपलब्ध असलेल्या पेमेंट पर्यायांद्वारे भरावे लागेल. तुमच्या वॉलेटमधील शिल्लक रक्कम राज्य महामार्गावरील टोल, पार्किंग इत्यादींसाठी वापरता येईल.
घराच्या जवळच्या टोल प्लाझासाठी माझ्याकडे आधीच लोकल पास (Local Pass) आहे. मी तरीही वार्षिक पास सक्रिय करू शकतो का?
होय. तुमच्याकडे स्थानिक किंवा मासिक पास (monthly pass) असला तरीही तुम्ही वार्षिक पास सक्रिय करू शकता. ज्या टोल प्लाझावर तुमचा दुसरा पास सक्रिय आहे, त्या ठिकाणी होणारे क्रॉसिंग तुमच्या वार्षिक पासमधून मोजले जाणार नाहीत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
August 14, 2025 2:43 PM IST
मराठी बातम्या/मनी/
Fastag Annual Pass: महाराष्ट्रात किती ठिकाणी लागू होणार Fastag Annual Pass? तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तरं