Gold Silver Price: अमेरिकेची धमकी, चीननं खेळ बिघडवला, सोनं-चांदीच्या बाजारात हाहाकार, ४८ तासांत २५ हजारांची उसळी

Last Updated:

Gold Silver Price: जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत सराफा बाजारात सध्या ऐतिहासिक तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरांनी सर्व विक्रम मोडीत काढले.

Gold Silver: अमेरिकेची धमकी, चीननं खेळ बिघडवला, सोनं-चांदीच्या बाजारात हाहाकार, ४८ तासांत २५ हजारांची उसळी
Gold Silver: अमेरिकेची धमकी, चीननं खेळ बिघडवला, सोनं-चांदीच्या बाजारात हाहाकार, ४८ तासांत २५ हजारांची उसळी
Gold Silver Price: जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत सराफा बाजारात सध्या ऐतिहासिक तेजी पाहायला मिळत आहे. गेल्या दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरांनी सर्व विक्रम मोडीत काढले असून, सोन्याने प्रथमच १.५० लाखांचा टप्पा पार केला आहे, तर चांदीने ३.३० लाखांची विक्रमी पातळी गाठली आहे.

दोन दिवसांत धुमाकूळ

सोमवारी ऐतिहासिक झेप घेतल्यानंतर मंगळवारीही दरवाढीचे सत्र कायम राहिले. मंगळवारी सोन्याच्या दरात तब्बल ४,३२६ रुपयांची वाढ होऊन प्रतितोळा भाव १,५३,५७३ रुपयांवर पोहोचला. केवळ दोन दिवसांत सोन्यात सुमारे ७ हजार रुपयांची वाढ झाली आहे.
चांदीच्या बाबतीतही हेच चित्र असून, सोमवारी १८,५४० रुपयांच्या विक्रमी वाढीनंतर मंगळवारी पुन्हा १५,४५० रुपयांची वाढ झाली. यामुळे चांदीने ३.३० लाखांचा नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.
advertisement

अमेरिका चीननं खेळ बिघडवला...

चांदीच्या बाबतीत चीनचा वाटा मोठा आहे. चीनमध्ये सौर ऊर्जा (Solar Panels) आणि इलेक्ट्रिक वाहनांचे (EV) उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. या दोन्ही उद्योगांमध्ये चांदीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. चीनकडून या उद्योगांसाठी वाढलेली मागणी चांदीच्या दरात विक्रमी वाढ करण्यास कारणीभूत ठरली आहे. चीनकडील चांदीचा साठा कमी होत असल्याने तिथून मागणी वाढली आहे. त्याच्या परिणामी चांदीच्या दरात वाढ झाली आहे.
advertisement
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ग्रीनलँडवरील अमेरिकेच्या नियंत्रणाला विरोध करणाऱ्या युरोपीय देशांवर कर लादण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांनी म्हटले आहे की १ फेब्रुवारी २०२६ पासून डेन्मार्क, नॉर्वे, स्वीडन, फ्रान्स, जर्मनी, युनायटेड किंग्डम, नेदरलँड्स आणि फिनलंड येथून अमेरिकेत येणाऱ्या वस्तूंवर १०% कर लादला जाईल. यानंतर, युरोपियन युनियन (EU) चे कायदेकर्त्यांनी अमेरिकेसोबतच्या EU च्या व्यापार कराराला मान्यता रोखण्याची तयारी केली आहे. ट्रम्पच्या धमकीनंतर तणाव वाढत असताना, गुंतवणूकदारांनी सुरक्षित मालमत्ता मानल्या जाणाऱ्या सोन्या-चांदीमध्ये गुंतवणूक वाढवली आहे.
advertisement

नव्या वर्षातील पहिल्या २० दिवसांत तुफान कमाई...

वर्ष २०२६ च्या पहिल्या २० दिवसांतच गुंतवणूकदारांची चांदी झाली आहे. या अल्प कालावधीत सोनं-चांदीचे दर चांगलेच वधारले.
सोनं/चांदी२० दिवसांतील वाढसद्यस्थिती (अंदाजे)
सोने (प्रतितोळा)₹ १५,७७३₹ १,५३,५७३
चांदी (प्रतिकिलो)₹ ८७,५५०₹ ३,३०,०००+
advertisement

गुंतवणूकदारांनी आता काय करावे? एक्सपर्ट काय म्हणतात...

बाजारातील ही अनपेक्षित वाढ पाहता तज्ज्ञांनी गुंतवणूकदारांना सावध पवित्रा घेण्याचा सल्लाा एक्सपर्टने दिला आहे.
नव्या गुंतवणूकदारांसाठी 'वेट अँड वॉच': २० दिवसांत झालेली वाढ अत्यंत वेगवान आहे. अशा परिस्थितीत बाजारात 'प्रॉफिट बुकिंग'मुळे दरात किंचित घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे घाई न करता दर थोडे स्थिरावण्याची वाट पाहावी.
advertisement
SIP चा पर्याय: एकदम मोठी रक्कम गुंतवण्याऐवजी दरमहा ठराविक रक्कम सोन्यात गुंतवावी (Systematic Investment Plan). यामुळे दरातील चढ-उताराचा धोका कमी होतो.
चांदीत गुंतवणूक करताना सावधान: चांदीमध्ये सोन्यापेक्षा जास्त परतावा मिळत असला तरी, त्यात अस्थिरताही अधिक असते. त्यामुळे एकूण गुंतवणुकीच्या केवळ ५ ते १० टक्के हिस्साच चांदीत ठेवावा.
पर्यायी गुंतवणूक: दागिने बनवण्याऐवजी केवळ गुंतवणुकीचा विचार असेल, तर गोल्ड ईटीएफ (ETF), सोव्हरन गोल्ड बाँड्स किंवा डिजिटल गोल्ड निवडावे. यामुळे मेकिंग चार्जेसची बचत होते.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold Silver Price: अमेरिकेची धमकी, चीननं खेळ बिघडवला, सोनं-चांदीच्या बाजारात हाहाकार, ४८ तासांत २५ हजारांची उसळी
Next Article
advertisement
Gold Silver Price: अमेरिकेची धमकी, चीननं खेळ बिघडवला, सोनं-चांदीच्या बाजारात हाहाकार, ४८ तासांत २५ हजारांची उसळी
अमेरिकेची धमकी चीननं खेळ बिघडवला, सोनं-चांदीच्या बाजारात हाहाकार, ४८ तासांत २५ ह
  • जागतिक घडामोडींच्या पार्श्वभूमीवर देशांतर्गत सराफा बाजारात सध्या ऐतिहासिक तेजी

  • गेल्या दोन दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरांनी सर्व विक्रम मोडीत काढले

  • सोन्याने प्रथमच १.५० लाखांचा टप्पा पार केला आहे, तर चांदीने ३.३० लाखांची विक्रम

View All
advertisement