GST Stocks Impact: GST कपातीमुळे 50 हून अधिक शेअर्सवर होणार थेट परिणाम, तुमच्याकडेही आहेत का?
- Published by:Shrikant Bhosale
Last Updated:
GST Stocks Impact: जीएसटी कौन्सिलच्या निर्णयाचा परिणाम आज शेअर बाजारातील 50 हून स्टॉक्सवर होण्याची शक्यता आहे.
GST Stocks Impact: गुरुवारी झालेल्या जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत कर रचनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. जीएसटीमध्ये आता फक्त 5 टक्के आणि 18 टक्के असे दोनच टप्पे असणार आहेत. आता नव्या जीएसटीमुळे दैनंदिन गरजेच्या वस्तू स्वस्त होणार आहे. जीएसटी कौन्सिलच्या निर्णयाचा परिणाम आज शेअर बाजारातील काही स्टॉक्सवर होण्याची शक्यता आहे.
advertisement
>> कोणत्या सेक्टरच्या कोणत्या कंपन्यांच्या शेअर्सवर होणार परिणाम?
ऑटो सेक्टर : (लहान कार, EV आणि 2W/3W), लहान कार आणि <1200cc/1500cc EV हायब्रिडवरील GST 28% वरून 18% पर्यंत कमी करण्यात आला आहे. याचा थेट फायदा मारुती सुझुकी, टाटा मोटर्स, बजाज ऑटो, हिरो मोटोकॉर्प, टीव्हीएस मोटरला होईल.
advertisement
350cc पेक्षा कमी क्षमतेच्या बाइक्सवरील GST 18% पर्यंत कमी करण्यात आला आहे, त्यामुळे मागणी वाढेल. अशा परिस्थितीत, सर्वात मोठी दुचाकी कंपनी हिरो मोटोकॉर्पला फायदा होईल, तर TVS, बजाज ऑटोच्या शेअर्सवर परिणाम होऊ शकतो.
FMCG सेक्टर: दूध, चीज, बिस्किटे, चॉकलेट, सॉस, साबण, शॅम्पू, आईस्क्रीमवरील GST 12% वरून 5% पर्यंत कमी करण्यात आला आहे. याचा फायदा HUL, Nestle, Britannia, ITC, Dabur, Colgate, Marico, Godrej Consumer ला होण्याची शक्यता आहे.
advertisement
सिमेंट आणि पायाभूत सुविधा: या क्षेत्राशी संबंधित शेअर्सवरही परिणाम होऊ शकतो. सिमेंटवरील जीएसटी 28% वरून 18% पर्यंत कमी करण्यात आला आहे. याचा थेट फायदा अल्ट्राटेक, श्री सिमेंट, अंबुजा, एसीसी, डालमिया भारत, जेके सिमेंट यांना होईल.
advertisement
ग्राहकोपयोगी वस्तू: एसी, टीव्ही, डिशवॉशरवरील जीएसटी 28% वरून 18% पर्यंत कमी करण्यात आला आहे. याचा फायदा व्होल्टास, हॅवेल्स, व्हर्लपूल, ब्लू स्टार, अंबर, डिक्सन यांना होईल.
आरोग्यसेवा आणि फार्मा सेक्टर: औषधे, वैद्यकीय उपकरणे आणि निदान 0-5% आहेत. सन फार्मा, सिप्ला, डॉ. रेड्डीज, अपोलो हॉस्पिटल्स, डॉ. लाल पॅथलॅब्स, मेट्रोपोलिस यांच्या शेअर्सवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
advertisement
विमा क्षेत्र: आरोग्य विमा, जीवन विमा प्रीमियमवरील जीएसटी रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे एलआयसी, एचडीएफसी लाईफ, मॅक्स लाईफ, स्टार हेल्थ, निवा बुपा या शेअर्सवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
कृषी क्षेत्र: शेती आणि खतांबद्दल बोललो तर ट्रॅक्टर, सिंचन उपकरणे, खत आणि अॅसिडवर 5% जीएसटी आहे. अशा परिस्थितीत एम अँड एम, एस्कॉर्ट्स कुबोटा, कोरोमंडेल, चंबळ, जीएनएफसी यांना फायदा मिळू शकतो.
advertisement
अक्षय ऊर्जा-सौर, पवन, बायोगॅस उपकरणे 5% करण्यात आली आहेत. सुझलॉन, आयनॉक्स विंड, टाटा पॉवर यांना थेट फायदा होईल.
हॉटेल उद्योगाकडे पाहिले तर 7500 रुपयांपर्यंतच्या हॉटेल खोल्यांवर जीएसटी 5 % करण्यात आला आहे. म्हणून, इंडियन हॉटेल्स, लेमन ट्री, शॅलेट हॉटेल्स, कामत हॉटेल्सना फायदा होईल.
कागद आणि पॅकेजिंग कंपनी: आता पुस्तके करमुक्त असतील, कार्टन/पल्पवर फक्त 5% आकारला जाईल. याचा फायदा जेके पेपर, आयटीसी (पेपरबोर्ड) यांना होईल.
कपडे आणि शूज: आता फक्त 5% जीएसटी आकारला जाईल. फायदा: रिलॅक्सो, बाटा इंडिया, ट्रेंट, शॉपर्स स्टॉप, व्ही-मार्ट यांना होईल.
>> या सेक्टरवर निगेटिव्ह परिणाम होण्याची शक्यता..
तंबाखू आणि पेये : कार्बेनेटेड आणि कॅफिनेटेड पेये, तंबाखूवर जीएसटी 40% पर्यंत वाढवण्यात आला आहे. अशा परिस्थितीत, वरुण बेव्हरेजेस, आयटीसी (तंबाखू), गॉडफ्रे फिलिप्स, व्हीएसटी इंडस्ट्रीज यांच्या शेअर्सवर दबाव येऊ शकतो.
कोळसा आणि वीज : कोळसा/लिग्नाइटवरील जीएसटी 5% वरून 18% पर्यंत वाढवण्यात आला आहे. एनटीपीसी, जेएसडब्ल्यू एनर्जीच्या शेअर्सवर दबाव येऊ शकतो.
ऑनलाइन सेवा/अन्न वितरण-सेवांवर 18% जीएसटी लागू होईल. इथरनल (झोमॅटो), स्विगीच्या शेअर्सवर परिणाम होऊ शकतो.
( Disclaimer: ही बातमी माहितीसाठी देण्यात आली असून गुंतवणूक विषयक सल्ला नाही. शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखीमीची असते. गुंतवणूक करण्यापूर्वी, कृपया तुमच्या आर्थिक सल्लागाराचा, तज्ज्ञाचा सल्ला घ्यावा. तुमच्या आर्थिक नुकसानीस 'NEWS18 मराठी' जबाबदार राहणार नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 04, 2025 8:47 AM IST
मराठी बातम्या/मनी/
GST Stocks Impact: GST कपातीमुळे 50 हून अधिक शेअर्सवर होणार थेट परिणाम, तुमच्याकडेही आहेत का?