जगात कुठेही काही घडलं तर भारतीय शेअर मार्केटमध्ये लोकांचे कोट्यवधी रुपये का बुडतात?

Last Updated:

जगात कुठेही युद्ध झाले तर आपल्या शेअर मार्केटवर का परिणाम होतो किंवा या युद्धाशी शेअर मार्केटच्या काय संबंध असतो पाहा.

+
News18

News18

डोंबिवली, 13 ऑक्टोबर: सध्या हमास आणि इस्त्राईलचे युद्ध सुरू आहे. हमासने इस्राईलमध्ये घुसखोरी करून दहशत माजविल्यानंतर इस्राईल गाझा पट्टीवर जोरदार हल्ले करत आहे. यामध्ये भारतीय शेअर मार्केटवर मोठा परिणाम होईल असे वाटत असताना फारसा परिणाम झालेला पाहिला मिळाला नाही. मात्र जगात कुठेही युद्ध झाले तर आपल्या शेअर मार्केटवर का परिणाम होतो किंवा या युद्धाशी शेअर मार्केटच्या काय संबंध असतो यासंदर्भातील माहिती डोंबिवलीतील अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर टिळक यांनी दिली आहे.
जागतिक अर्थकारणात आपल्या देशाला विशेष स्थान
जागतिक अर्थकारणात, राजकारणात, समाजकारणात आपल्या देशाला एक विशेष स्थान आहे.
कोरोनाचे संधीमध्ये रूपांतर
विशेषतः कोरोना काळानंतर ज्या पद्धतीने भारताच्या अर्थकारणात बदल झाला आहे तो लक्षणीय आहे. कोरोनात इतर देश आर्थिक संकटात असताना भारताने मात्र या काळाचे संधीमध्ये रूपांतर केले. त्यामुळे ज्या देशाच्या अर्थकारण वाढत आहे त्या देशावर या सर्व गोष्टींचा परिणाम होणे साहजिक असल्याची माहिती टिळक यांनी दिली.
advertisement
आता युद्धाच्या चर्चा अधिक होतात
युद्ध काही पहिल्यांदा होत नाही किंवा शेअर बाजारही नुकताच सुरू झालेला नाही. मात्र सुरुवातीच्या काळात इतक्या मोठ्या प्रमाणत चर्चा होत नसतं आता त्या होऊ लागल्या आहेत. मात्र आपण इतिहास पाहिला तर ज्या ज्या वेळी जगात युद्ध झालं त्या त्यावेळी शेअर बाजारावर त्याचा परिणाम झालेला पहिला मिळाला आहे.
advertisement
रशिया बरोबर आयात निर्यात अधिक
रशिया आणि युक्रेन हे दोन्ही देश भारताच्या भौगोलिक दृष्ट्या अधिक जवळ आहेत तितके हमास किंवा इस्त्राईल नाही. रशियाशी आपले संबंध देश स्वतंत्र झाल्यापासून चांगले आहेत. सुरुवातीपासूनच आपल्या आर्थिक धोरणामध्ये रशियाचा प्रभाव चीनपेक्षाही अधिक होता. जागतिक व्यापारात गेल्या 40 ते 50 वर्षात रशिया बरोबर आयात निर्यातीचा व्यापार अधिक होतो. इतकेच नव्हे तर तेलाच्या बाबतीत सध्या राशीत भारताचा मोठा पुरवठादार आहे. म्हणून रशिया आणि युक्रेनच्या युद्धात भारतीय शेअर मार्केटवर अधिक परिणाम झालेला पहिला मिळालं.
advertisement
इस्त्राईल आणि पॅलेस्टाईन बरोबर व्यापारी संबंध नाहीत
पॅलेस्टाईनशी आपले कोणतेही व्यापारी संबंध नाहीत. तर इस्त्राईलमध्ये आपल्याकडील अदानीसारख्या काही समूहाच्या कंपन्या आहेत. काही बँकाच्या शाखा आहेत. काही बंदर आहेत. मात्र असे असले तरी कितीतरी मोठ्या प्रमाणत रशियाशी आपले व्यापारी संबंध आहेत. सध्या शेअर बाजारावर परिणाम कमी होणे ही तात्कालिक प्रक्रिया असू शकते. युद्धाची व्याप्ती ज्याप्रमाणे लांबत जाईल त्याप्रमाणे परिणाम पाहिला मिळू शकतात, अशी माहिती चंद्रशेखर टिळक यांनी सांगितले.
advertisement
लेटेस्ट बातम्या आणि व्हिडीओ पाहण्यासाठी न्यूज18 लोकमतच्या या अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनलला करा फॉलो…या लिंकवर क्लिक करा
view comments
मराठी बातम्या/मनी/
जगात कुठेही काही घडलं तर भारतीय शेअर मार्केटमध्ये लोकांचे कोट्यवधी रुपये का बुडतात?
Next Article
advertisement
Devendra Fadnavis: CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी
  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

  • CM फडणवीस ॲक्शन मोडमध्ये, मंत्र्यांना चाप, 'या' बैठकीसाठी घ्यावी लागणार परवानगी

View All
advertisement