LIC पॉलिसी मध्येच बंद केली तर किती होतं नुकसान, कशी असते प्रक्रिया?
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
LIC : तुम्ही तुमची पॉलिसी मध्येच बंद करू शकता का? ती बंद केल्यास किती पैसे मिळतील आणि त्यामुळे किती नुकसान होईल. याबद्दल जाणून घेऊयात.
मुंबई, 1 सप्टेंबर : आयुष्यात कधीही पैशांची गरज भासू शकते, अशा परिस्थितीत प्रत्येक जण आपल्या बचतीमधून पैशांची व्यवस्था करतो. अनेकांनी विमा पॉलिसी आणि म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केलेली असते. बरेच जण पैसे इमर्जन्सीमध्ये LIC पॉलिसी बंद करण्याचा निर्णय घेतात. परंतु एलआयसीच्या अनेक पॉलिसी लॉक इन पीरियडसह येतात. तुम्ही तुमची पॉलिसी मध्येच बंद करू शकता का? ती बंद केल्यास किती पैसे मिळतील आणि त्यामुळे किती नुकसान होईल. याबद्दल जाणून घेऊयात.
पॉलिसी कधी बंद करता येते?
उत्तरः एलआयसी पॉलिसी घेतल्यापासून 15 दिवसांच्या आत बंद करायची असेल, तर तुम्ही ती सहज बंद करू शकता. त्यानंतर तुम्ही पॉलिसी तीन वर्षांनंतर बंद केल्यास तुमचे नुकसान होऊ शकते.
तीन वर्षांत बंद केल्यास काय होईल?
उत्तर: जर तुम्ही तुमची पॉलिसी घेतल्यानंतर तीन वर्षांत बंद केली तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. म्हणजेच तुम्ही जितका प्रीमिअम भरला आहे, तितके सर्व पैसे बुडतील.
advertisement
मग पॉलिसी कधी बंद करता येईल?
उत्तर: LIC च्या पॉलिसीमध्ये 3 वर्षांचा लॉक-इन पीरियड असतो. त्यामुळे तुम्ही तुमची पॉलिसी 3 वर्षांनंतर कधीही बंद करू शकता. ती बंद करण्यासाठी तुमच्याकडून कोणतेही पैसे घेतले जाणार नाहीत. जर तुम्ही संपूर्ण 3 वर्षांसाठी LIC चा प्रीमिअम भरला असेल, तरच तुम्ही तो सरेंडर करू शकता.
तीन वर्षांनी बंद केल्यावर किती पैसे मिळतील?
उत्तरः LIC मध्ये काम करणार्या कांता कंडारी यांच्या म्हणण्यानुसार, तुम्ही तुमची LIC पॉलिसी तीन वर्षांनी बंद केल्यास तुम्हाला तुमच्या प्रीमिअमच्या 75 टक्के रक्कम परत मिळते. मुदतपूर्तीपूर्वी पॉलिसी बंद केल्यास ग्राहकांचे मोठे नुकसान होते. त्याची व्हॅल्यूदेखील कमी होते. म्हणजेच तुम्ही पहिल्या वर्षी भरलेला प्रीमिअम झिरो मानला जाईल.
advertisement
काही कागदपत्रे लागतील का?
view commentsउत्तरः एलआयसी पॉलिसीचे बाँड डॉक्युमेंट, सरेंडर व्हॅल्यू पेमेंटची विनंती, एलआयसी सरेंडर फॉर्म- फॉर्म 5074, एलआयसी एनईएफटी फॉर्म, तुमच्या बँक खात्याचे डिटेल्स, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स, बँकेचा रद्द केलेला चेक या कागदपत्रांसह एलआयसी पॉलिसी बंद करण्याचे कारण लेखी द्यावे लागेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 01, 2023 7:00 AM IST


