LIC सगळेच काढतात पण तुम्हाला माहिती आहे का भारतात त्याची सुरुवात कशी झाली?
- Published by:News18 Marathi
- trending desk
Last Updated:
भारतात विमा पॉलीसींची सुरुवात कधीपासून झाली आणि देशात किती प्रकारचे विमा अस्तित्वात आहेत याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी देण्यात आली आहेत.
मुंबई, 1 सप्टेंबर : भविष्यातील फायनॅन्शियल सिक्युरिटीसाठी विमा पॉलिसींना सर्वात सेफ पर्याय मानलं जातं. 'विमा' हा एक असा शब्द आहे जो ऐकून तुमची भीती दूर होते. कारण, आर्थिक अडचणी, आरोग्याची समस्या असताना विम्याद्वारे तुम्हाला आर्थिक फायदा होतो. पण, भारतात विमा पॉलीसींची सुरुवात कधीपासून झाली आणि देशात किती प्रकारचे विमा अस्तित्वात आहेत याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? या प्रश्नांची उत्तरं या ठिकाणी देण्यात आली आहेत.
विम्याचा इतिहास
भारतातील विम्याचा इतिहास खूप जुना आहे. मनू (मनुस्मृती), याज्ञवल्क्य (धर्मशास्त्र) आणि कौटिल्य (अर्थशास्त्र) यांच्या लेखनात या शब्दाचा उल्लेख आहे. प्राचीन भारतीय इतिहासात सागरी व्यापारी कर्ज आणि वाहक करार हे विमाच होते. इतर देशांच्या, विशेषतः इंग्लंडच्या प्रभावाखालील देशांत विमा पॉलिसी सुरू झाल्या. 'ओरिएंटल लाईफ इन्शुरन्स' ही भारतातील पहिली विमा कंपनी कलकत्ता (कोलकाता) येथे 1818 मध्ये स्थापन झाली. 1834 मध्ये ही कंपनी दिवाळखोरीत निघाली.
advertisement
'ओरिएंटल लाईफ इन्शुरन्स'च्या स्थापनेच्या सुमारे पाच वर्षांनंतर म्हणजे 1823 मध्ये एका भारतीय व्यक्तीनं 'बॉम्बे लाईफ अॅश्युरन्स' कंपनी सुरू केली. यानंतर 1829 मध्ये 'मद्रास इक्विटेबल गॅरेंटर' कंपनी सुरू झाली. 1914 मध्ये, भारत सरकारनं भारतातील विमा कंपन्यांचे रिटर्न प्रकाशित करण्यास सुरुवात केली. भारतीय जीवन विमा कंपनी कायदा, 1912, हा जीवन विमा व्यवसायाचं नियमन करणारा पहिला कायदेशीर उपाय होता.
advertisement
1956 मध्ये एलआयसीची स्थापना
सरकारने 19 जानेवारी 1956 रोजी जीवन विमा क्षेत्राचं राष्ट्रीयीकरण करणारा अध्यादेश काढून आयुर्विमा महामंडळ स्थापन केलं. एलआयसीनं 154 भारतीय, 16 गैर-भारतीय विमा कंपन्या तसेच 75 भविष्य निर्वाह संस्था, 245 भारतीय आणि परदेशी विमा कंपन्या आपल्यात समाविष्ट करून घेतल्या. 90 च्या दशकाच्या उत्तरार्धापर्यंत एलआयसीची मक्तेदारी होती. त्यानंतर विमा क्षेत्र खासगी क्षेत्रासाठी खुलं करण्यात आलं.
advertisement
विम्याचे किती प्रकार आहेत?
सामान्य विमा (जनरल इन्शुरन्स) आणि जीवन विमा (लाईफ इन्शरन्स) हे विम्याचे प्रामुख्याने दोन प्रकार आहेत.
जनरल इन्शुरन्स: सामान्य विमा पॉलिसी हा विम्याच्या असा प्रकार आहे जो पॉलिसीधारकाच्या मृत्यूशिवाय इतर नुकसानीसाठी विम्याच्या रकमेच्या स्वरूपात कव्हरेज प्रदान करतो. सामान्य विम्यात विविध प्रकारच्या विमा पॉलिसी जसे की, बाईक, कार, घर, आरोग्य इत्यादींचा समावेश होतो. या पॉलिसी लाएबिलीटीमुळे होणाऱ्या नुकसानापासून आर्थिक संरक्षण देतात.
advertisement
लाईफ इन्शरन्स: पॉलिसीधारकाचा मृत्यू किंवा अपंगत्व यासारख्या दुर्दैवी घटनांसाठी जीवन विमा योजना संरक्षण प्रदान करतात. आर्थिक संरक्षणाव्यतिरिक्त, अशा विविध प्रकारच्या जीवन विमा पॉलिसी आहेत, ज्या पॉलिसीधारकांना विविध इक्विटी आणि डेट फंड पर्यायांमार्फत बचत करण्याची परवानगी देतात. लाईफ इन्शुरन्समध्येच तुम्हाला टर्म लाईफ, संपूर्ण लाईफ, एंडोवमेंट, युनिट-लिंक्ड, चाइल्ड, पेन्शन असे प्लॅन मिळतात.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 01, 2023 6:00 AM IST