advertisement

Gold Silver Price: दोन दिवसांनंतर आज सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ, २२ आणि २४ कॅरेटचे पाहा दर

Last Updated:

सोन्या-चांदीच्या किमती सध्या एका मर्यादित कक्षेत राहण्याची शक्यता आहे. जोपर्यंत अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीचे निकाल आणि महागाईची आकडेवारी स्पष्ट होत नाही, तोपर्यंत बाजारात असाच चढ-उतार पाहायला मिळू शकतो.

गोल्ड प्राइज क्रॅश
गोल्ड प्राइज क्रॅश
गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या किमतीत होणारी घसरण पाहून ज्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला होता, त्यांच्यासाठी आजची बातमी थोडी चिंतेची आहे. दोन दिवस शांत बसलेल्या सोन्याने आज पुन्हा एकदा जोरात गती पकडली असून भाव वाढले आहेत. भारतीय वायदा बाजारात (MCX) सोन्याच्या दरात तब्बल १,३३८ रुपयांची वाढ झाली असून, तो आता १,५२,७५६ रुपये प्रति १० ग्रॅमवर पोहोचला आहे. केवळ सोन्यानेच नाही, तर चांदीनेही आज मोठी भरारी घेत गुंतवणूकदारांना आश्चर्याचा धक्का दिला आहे.
नेमकं काय घडलं?
जागतिक बाजारात जरी काही प्रमाणात घसरण दिसत असली, तरी भारतीय बाजारपेठेत चित्र पूर्णपणे वेगळं आहे. अमेरिकन डॉलरचा निर्देशांक वाढल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सोने खरेदी महागली आहे. चीन, सिंगापूर आणि दक्षिण कोरियामध्ये लूनर न्यू इयरच्या सुट्ट्यांमुळे व्यवहार थंडावले आहेत, ज्याचा परिणाम जागतिक व्यापारावर होत आहे. चांदीच्या किमतीत गेल्या तीन दिवसांत किलोमागे १५ हजारांची घसरण झाली होती, पण आज पुन्हा ४,६६६ रुपयांच्या वाढीसह चांदी २,३३,४४९ रुपयांवर व्यवहार करत आहे.
advertisement
सोन्याचे दर
२४ कॅरेट: १,५५,५२१ रुपये
२२ कॅरेट: १,४२,५८२ रुपये
१८ कॅरेट: १,१६,६४० रुपये
शहरानुसार सोन्याचे दर
मुंबई- १,५४,१९०
दिल्ली- १,५४,३४०
पुणे / बेंगळुरू- १,५४,१९०
चांदीची चेन्नई एक्सप्रेस सुसाट!
चांदीच्या बाबतीत आज चेन्नईने देशात बाजी मारली आहे. दिल्ली आणि मुंबईत चांदी २,५९,९०० रुपये प्रति किलोने विकली जात असताना, चेन्नईमध्ये हाच दर २,६४,९०० रुपयांपर्यंत पोहोचला आहे. तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत अमेरिकन फेडरल रिझर्व्हच्या बैठकीचा निकाल आणि महागाईची नवी आकडेवारी समोर येत नाही, तोपर्यंत बाजारात अशीच 'धडधड' सुरू राहील. त्यामुळे जर तुम्ही मोठ्या गुंतवणुकीचा विचार करत असाल, तर थोडे दिवस थांबून बाजाराचा कल पाहणं फायद्याचं ठरू शकतं.
view comments
मराठी बातम्या/मनी/
Gold Silver Price: दोन दिवसांनंतर आज सोन्या चांदीच्या दरात पुन्हा वाढ, २२ आणि २४ कॅरेटचे पाहा दर
Next Article
advertisement
Grampanchayat Election: गावगाड्याचा कारभारी ठरणार, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजला, 'या' तारखांवर ठेवा लक्ष
गावगाड्याचा कारभारी ठरणार, राज्यातील ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजला, 'या' त
  • राज्यातील ग्रामीण भागातील राजकीय हालचालींना आता वेग येणार आहे.

  • गावगाड्याचा कारभार पाहणाऱ्या ग्रामपंचायती निवडणुकांची लगबग सुरू झाली आहे.

  • येत्या २० फेब्रुवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.

View All
advertisement